३ ट्रॅक्टरची रेती घाटावर जप्ती
नेरी सर्कल मधील काजळसर परिसरात केली कारवाई
रेती तस्करात दहशतीचे वातावरण
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - सध्या संपूर्ण जगात कोविड - १९ या संक्रमणग्रस्त विषाणूचा थैमान चालू असताना संपूर्ण प्रशासन हे कोविड - १९ या विषाणू च्या सभोवताल फिरत आहे. संपूर्ण प्रशासन हे रात्रंदिवस त्याच कामात व्यस्त आहे अशातच महसूल प्रशासनावर ही सर्वात मोठी जबाबदारी असताना संपूर्ण महसूल प्रशासन या कामात व्यस्त आहे.शहरातील रेती तस्कर हिच संधी म्हणून रात्रंदिवस रेतीचे अवैध उत्खनन करीत आहे त्यामुळे संपूर्ण चिमूर तालुक्यात महसूल प्रशासनाकडे सामान्य नागरिक संशयाच्या भूमिकेतून पाहत होते.
अशातच चिमूर तालुक्यातील नेरी सर्कलमधील काजळसर परिसरात अवैध रेती उत्खनन चालू आहे अशी विश्वासदर्शक माहिती पिंपळनेरी चे तलाठी चंदन करमरकर , मासळ चे तलाठी अमोल घाटे व खडसंगी चे तलाठी वैभव कार्लेकर यांना मिळाली त्यामुळे त्यांनी क्षणाचाही विलंब न करता उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ चिमूर व माननीय तहसीलदार संजयजी नागटिळक चिमूर यांच्या मार्गदर्शनाखाली काजळसर घाटात धाळ टाकून कारवाई केली या कारवाईत ३ ट्रॅक्टरची तीन ब्रास सह घाटावर जप्ती करण्यात आली हि ट्रॅक्टर सोनवाणे यांच्या मालकीचे २ ट्रॅक्टर व निकोडे यांच्या मालकीचे १ ट्रॅक्टर असे एकूण ३ ट्रॅक्टर ब्रास रेती सहित पकडून तहसील कार्यालय चिमूर येथे लावण्यात आले. हे दोघेही काजळसर येथील रहिवासी आहे.व यामुळे रेती तस्करांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आणि सामान्य नागरिकही या कारवाईबद्दल महसूल प्रशासनाचे कौतुक करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!