गांगलवाडी परिसरातील सलून व्यवसाय 31 मे पर्यंत बंद

गांगलवाडी परिसरातील सलून व्यवसाय 31 मे पर्यंत बंद'चा निर्णय.


गांगलवाडी (सुरज सुर्यवंशी)
सध्या देशात कोरोनाचा प्रभाव वाढत असून, गांगलवाडी परिसरात सुद्धा त्याचा प्रादुर्भाव वाढत आहे.
सलून व्यवसायमध्ये ग्राहका सोबत बऱ्याचदा संपर्क येतो. त्यामुळे सलून व्यवसाय सुरू राहिल्यास या रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची शक्यता जास्त असते त्याचबरोबर सलून व्यवसायिकास या रोगाची बाधा होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे सामाजिक भान ठेवून आणि प्रशासनास सहकार्य करण्याचा उद्देश गांगलवाडी परिसरातील संपूर्ण सलून व्यवसायिकांनी ३१ मे पर्यंत सलून बंद ठेवण्याचा निर्णय नाभिक समाज गांगलवाडी च्या वतीने घेण्यात आला आहे.
नाभिक समाज गांगलवाडी च्या निर्णयास संपूर्ण गांगलवाडी परिसरातील सलून व्यवसायिकांनी कडकडीत बंद ठेवून सहकार्य करावे. अशी विनंती नाभिक समाज गांगलवाडी तर्फे करण्यात आली आहे. या बैठकीला नाभिक समाज गांगलवाडी चे अध्यक्ष होमराजजी पगाडे, उपाध्यक्ष फाल्गुन वनस्कर, पुरुषोत्तमजी सूर्यवंशी, नंदलाल बारसागडे, शिवचरण लांजेवार, नीलकंठ पगाडे, नकुल पगाडे, गुलाब वनस्कर, राजू वनस्कर, आणि राहुल बारसागडे हे सर्व संपूर्ण सदस्यगण तिथे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!