जीवन एक संधी

जीवन एक संधी

जीवन खूप सुंदर आहे. त्याला चांगल्या तऱ्हेने जगायला शिका! जीवन हा एक अनमोल खजिना आहे. त्याला कधीच स्वतःच्या चुकीने गमावू नका! जीवन हे सर्वस्व आहे. असं समजा की, जीवन हे एकदाच मिळत, पण खरं जीवन हेच की, जो व्यक्ति समाजाच्या कल्याणासाठी जगतो, एक दुसऱ्याला समजून घेतो, सुख-दुःखात मदत करतो, मोठ्यांचा आदर करतो तोच खरा मनुष्य!
जीवन खूप सुंदर आहे, त्याला पुन्हा सुंदर बनवूया! पण गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी सर्व काही सांभाळून करणे आणि त्याबद्दलच्या उत्तराची अपेक्षा करणे, हेच त्या जीवनामागचे सार्थक आहे. जीवन जगतांना विचार करू नये कधीच, कारण जीवनाची वजाबाकी ही शून्यच असते.
जीवन हे प्रत्येकाला मिळत नाही ज्याला मिळते त्याला त्याचे महत्व कळत नाही. "चंद्राने अंधार आणला तरी सूर्य उजडायचा नसतो." काही गोष्टी ठरल्याच असतात म्हणून जीवन कितीही सुंदर असलं तर एक दिवस मातीत मिसळायचं असत."
जीवनात खूप काही असत त्यातलं एक म्हणजे 'प्रेम' प्रेमाला आवर नसतो  योग्य वेळेत आणि योग्य वयात प्रेम करा. प्रेम झालं की, मग काही सुचेनास होत प्रेमाचेच विचार येतात मनात.  मग मना सारख नाही झालं तर कुठलाही विचार न करता  काहींच जीवन संपवणं,  तर काहीचं जीवन पणाला लागते. काय अर्थ मग आई बाबांच्या  संस्कारांना गुरुजनांच्या शिकविण्याला? आयुष्यात प्रेमाला इतके महत्व तर मग जीवनाला का नाही? जीवन इतकं स्वस्त आहे का? मनासारख नाही झालं तर असं समजाणं की,  मी त्या प्रेमाच्या लायक नाही? किंवा समोरची व्यक्ती आपल्या प्रेमाच्या लायक नाही?  प्रेमासाठी जीवन गमावू नका रे बाबांनो!  त्या नऊ महिने  पोटात वाढवणाऱ्या आई चा विचार करा एकदा.  त्या कष्ट करणाऱ्या बापाचा विचार करा.  बहीण भावाचा विचार करा. आता मिळालेल्या एका प्रेमासाठी तुम्ही या सर्वांना सोडून जाता. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही असे निर्णय घेता त्याला पुन्हा प्रेम मिळेल.  काही वर्षात तुम्हाला तो  विसरेल!  पण.....  पण..... त्यांच काय?  ज्यांची काही चूक नसतानाही तुम्हाला गमवल!  त्या आईच काय?  जीने आपलं बाळ गमावल त्या बापाचं काय? ज्यांचे स्वप्न मोडले त्या बहीण-भावाच काय? ज्यांनी आपल्या खेळण्यातली एक बाहुली गमावली!  याचा विचार करता का कधी? प्रियकर काय हो,  आज रडेल उदयाला परत दुसरी बघेल. प्रेम पुन्हा मिळते पण जीवन एकदाच मिळते.  प्रेमासाठी जीवन संपवू नका. म्हणूनच म्हणते जीवन एकदाच मिळते चांगल्या तऱ्हेने सर्वांचे प्रेम घ्या,  मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. लहानांना प्रेम द्या सर्वांशी चांगले वागा आणि चांगले मनुष्य घडून जीवनाला विराम द्या. यातच खरं जीवन आहे. म्हणून जीवन एक आहे. 

                 कुमुद भोयर, मूल, जिल्हा - चंद्रपूर

४ टिप्पण्या:

झिंदाबाद!