अ. भा. नक्षत्र महाकाव्यसंमेलन - एक आढावा
*ओझर चे अ.भा. नक्षत्र महाकाव्यसंमेलन - कवीमंडळीसाठी नवीनउर्जा प्रदान करणारा ह्दय सोहळा*....
ओझर च्या पावन भूमित आपण दि. २२ व २३ फेब्रुवारीला सर्व रसिक नक्षत्र उपस्थित राहून प्रभावीपणे काव्यसादरीकरण केले, नव्याने झालेल्या एकमेकांशी मैत्रीसोबत काव्याचा आनंद लुटला.
एकमेकांबद्दल आदरभाव व प्रेमपुर्वक संवाद साधत दोन दिवस विघ्नहर क्षेत्री मनापासून रमलात. शब्द बहरले,अंतरी भीडले,कृतीत उतरले अशी अवस्था येथील प्रत्येकांची झालेली होती, त्याबद्दल सर्व रसिक मित्रांचे कौतुक करतो.
अपरिचितांनाही आपला वाटावा असा हा नक्षत्राचं देणं काव्यमंच चा मोठा परिवार आहे. सर्वांना सामावून घेणारा आहे. या परिवारास वीस वर्षाचा अखंड काव्यचळवळीचा प्रवास आहे. राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.राजेंद्रजी सोनवणे हे मुख्य शिलेदार आहे.
त्यांच्या नियोजनात सहावे अखिल भारतीय मराठी नक्षञ महाकाव्यसंमेलन ओझर येथे अतिशय उत्साहात संपन्न झाले . केंद्रीय समितीच्या मार्गदर्शनात जुन्नर तालुका च्या वतीने भक्तभवन सभागृहात नुकतेच पार पडले.या दोन दिवसांच्या महाकाव्यसंमेलनात काव्यग्रंथदिंडी,दोन परिसंवाद,नऊ काव्यमैफल,प्रकट मुलाखत अशा भरगच्च कार्यक्रमाने महाकाव्यसंमेलन गाजले. शिवबाच्या शिवनेरी पर्यंत कवीनी म्हटलेली पोवाडा गीते जाऊन त्यांना वंदन करून आलीत.
महाकाव्यसंमेलनाची सुरुवात अष्टविनायक श्री विघ्हनर गणपती मंदिर ते भक्तभवन महाकाव्यसंमेलनस्थळापर्यंत काव्यग्रंथदिंडी काढण्यात आली.या काव्यग्रंथदिंडीमध्ये श्री विघ्हनर विद्यालय,ओझर,जयहिंद इंजिनिअरींग काॅलेज,कुरण चे विद्यार्थी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले. तसेच स्थानिक नागरिक,ग्रामस्थ,महिलामंडळ,
ज्येष्ठ नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा ठरला. महाकाव्यसंमेलनाध्यक्ष लोककवी डाॅ.विठ्ठल वाघ, उदघाटक समाजभूषण जगन्नाथ कवडे, स्वागताध्यक्ष शिवनेरभूषण तात्यासाहेब गुंजाळ,नक्षञाचं देणं काव्यमंच राष्टीय अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे,जुन्नर तालुका अध्यक्ष अॅड . जयराम तांबे,सुप्रसिदध उद्योजक संदीप नाईक,उद्योजक लक्ष्मीकांत कांजळे,अॅड.प्रफुल्ल भुजबळ,सरचिटणीस डाॅ शांताराम कारंडे,महाराष्ट्र समन्वयक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, ज्येष्ठ पत्रकार जयवंत बामणे,बी.व्ही.मांडे,राजेंद्रकुमार शेळके,पियुष काळे,गणेश कवडे,मिलींद कवडे,शिरीष बो-हाडे,मंगेश शेळके,डाॅ.बी.व्ही.राऊत,प्रकाश जगताप,शुभम नाईक,बी.आर.गाढवे, राऊत,चंदुराम पाथोडे, सर्पे,संजीव शेरमकर,हेमंत रत्नपारखी,अॅड.बाळासाहब तोरस्कर,प्रा.सुरेखा कटारिया,प्रभाकर ढोमसे,विनायक विधाटे,मनमोहन जालेपोलेल्लु,रजनी ताजणे,परशुराम नेहे,सचिन पाटील,आरती धारप,ज्योती शिंदे,सुनिल बिराजदार,सुभाष मोरे,मो.शकील जाफरी,राजेंद्र जोगळेकर,जगदीप वनशिव,अॅड.राम कर्पे,रामदास घुंगटकर,अॅड.सुधीर ढोबळे,मुख्या.विलास दांगट, कांबळे,कारभारी थोरात,केवलचंद सहारे,अरुण कांबळे,बाळासाहेब थोरात,किशोर कवडे,पांडुरंग कवडे,दशरथ मांडे,संतोष कवडे,भालुकाका जोशी,प्रदीप वैराळ,गणेश डबडे,रोशन सोनवणे,सोमनाथ घोडे,अॅड.प्रवीण वैराळ,गजानन सोनवणे,महेंद्र थोरवे,संपत गायकवाड,निखील मांडे,परवेश चौधरी,मैलारीराज कावळे,नितीन लोणारी,बाबामियाँ शैख,विजय कांबळे,अतुल परदेशी,सचिन ठाकुर,ज्ञानेश्वर मडके,प्रविण कोईडकर,जितेंद्र मोरे,सदानंद उर्कीडे,प्रीतम फुलपगार,हिरामण माळवे,सागर सोनवणे,ताईबाई सोनवणे,अनिल डबडे,हरिप्रसाद देवकल,अनिल बनकर,राजु मोरे,शिवनाथ गायकवाड,सतिश कांबळे तसेच आलेल्या कवी कवयिञीं अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला.
पर्यावरण संदेश देत वृक्ष पुजा करुन व पाणी घालून आगळ्यावेगळ्या पध्दतीने महाकाव्यसंमेलनाचे उदघाटन जगन्नाथ कवडे यांच्या हस्ते करण्यात आले. हे सहावे
महाकाव्यसंमेलन असल्यामुळे सहा काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.त्यात कविवर्य मोहन जोंधळेगुरुजी-"बहुरंगी काव्यसुमने"(काव्यसंग्रह)सोलापूर,कविवर्या सौ.सुजाता शिंदे-"प्रतिबिंब"(काव्यसंग्रह)
बारामती,कवी वादळकार-"वादळाचे घोगांवणे"-(चारोळीसंग्रह)शिरोली बुद्रुक,पुणे,कविवर्य अॅड.राम कर्पे-"आशियाना"(काव्यसंग्रह)
जुन्नर,कविवर्य जितेंद्र देशपांडे-"भाव अंतरीचे(काव्यसंग्रह)बैंगलोर,
कविवर्या किरणताई मोरे-"मधुगंध"(काव्यसंग्रह)
गोंदिया तसेच महाकाव्यसंमेलन स्मरणिका "काव्यातील नक्षञ"प्रकाशन डाॅ.विठठल वाघ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उदघाटक जगन्नाथ कवडे म्हणाले की,"माझ्या जुन्नर तालुक्यात,शिवरायांच्या जन्मभूमीत,अष्टविनायक गणपती श्री विघ्हनर गणपतीच्या सानिध्यात हा सोहळा संपन्न होत आहे.आपण आयुष्यात पैसे किती कमविले.त्यापेक्षा आपण किती माणसे कमविली हे महत्वाचे आहे.कविंच्या विकासासाठी ध्यास घेतलेला का काव्यमंच आहे.भविष्यातील कवी लेखक ह्या व्यासपीठातुनच घडणार आहे."
स्वागताध्यक्ष श्री तात्यासाहेब गुंजाळ म्हणाले की,"नक्षञाचं देणं काव्यमंचचा प्रवास हा मराठीमनाला अभिमान वाटावा असाच आहे .कवीमनाची हि हळवी आणि मृदू माणसे ख-या अर्थाने माणुसकी जपणारी माणसे आहे.गुणीजनांना एका व्यासपीठावर आणुन त्यांचा आदर करुन त्यांना प्रोत्साहन देणारी एक सामाजिक संस्था आहे."
महाकाव्यसंमेलन अध्यक्ष लोककवी डाॅ.विठ्ठल वाघ यांनी तर सर्वांना जिंकून घेतले. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की,"कवी हा सृष्टीचा निर्माता,समाजाचा मार्गदर्शक असतो.प्रत्येक कवीची सृष्टी,विश्व हे वेगवेगळे असते.आज आपल्यातील काही लोक सशक्त कविता लिहितात.जी मराठी कवितेचे दालन समृध्द करते.लौकिक वाढवते.कवितेत ताल,लय,वृत्त,छंद यांचा अभाव नसावा.प्रतीक,प्रतिमा यातुन आलेली सूचकता हेच कवितेचे प्राणत्व असते."
प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी प्रास्तविक करतांना चळवळीवर समर्पक भाष्य केले. चिंचवडच्या सुप्रसिद्ध सूत्रसंचालनकार डाॅ.श्वेता राठोड यांनी तर संमेलनाच्या सुरूवातीला चांगलाच रंग भरला.
पहिल्या काव्यमैफलीनंतर
झालेल्या
परीसंवादात संतकाव्य व आजची कविता यावर रंगतदार चर्चा झाली .विचारवंत वक्ते म्हणून कवीवर्य ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर चंद्रपूर , प्रा.डाॅ.रवींद्र सोमोशी (पोलादपुर) ,प्रा.सतिश वाघमारे (पुणे),प्रा,सुरेखा कटारिया(चिंचवड),यांनी आपले विचार व्यक्त केले.कवितेला हजारोंवर्षाची परांपरा आहे.ती जपण्याचे काम कवी करत आहे. मानवतावादी विचारांची पेरणी सातत्याने झाली पाहिजेत असा विचार पुढे आला.
नक्षञांची काव्यतारांगण काव्यमैफील जयवंत बामणे यांच्या अध्यक्षखाली पार पडली.सूञसंचालन रानकवी जगदीप वनशिव यांनी केले.
स्मार्ट कवींची बोल्ड काव्यमैफल लक्ष्मीकांत काजळे यांच्या अध्यक्षखाली संपन्न झाली.सूञसंचालन आरती धारप यांनी केले.
नक्षञांची काव्यफुले काव्यमैफल युवाउद्योजक गणेश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.सुञसंचालन ज्योती शिंदे यांनी केले.
नक्षञांची प्रेमकाव्य फुलोरा काव्यमैफल डाॅ.बी.व्ही.राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.सूञसंचालन योगिता कोठेकर यांनी केले.
दिवसभरांच्या विविध कवी कवयिञींनी बहारदार कविता सादरकरुन विविधपैलुंना स्पर्श करणा-या कविता सादर केल्यात.
संमेलनाचा दुसरा दिवस सकाळीच सातला सुरु झाला.चिञकाव्यलेखन स्पर्धा घेण्यात आली.अनेक कवी कवयिञींनी सहभाग घेऊन काव्यलेखन केले.
दुस-या दिवसाच्या सञाचे उदघाटन शुभहस्ते उद्योजक संदीपजी नाईक (चेअरमन- परिवार ग्रुप,नारायणगाव)करण्यात आले.त्यांच्या शुभहस्ते चिञकाव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले.यावेळी संदीपजी नाईक म्हणाले,"मी अनेक वर्षे या काव्यचळवळीशी संबधीत आहे.हि संस्था सर्वांच्या कौतुकास पाञ आहे.संपुर्ण महाराष्टात काव्यक्षेञात काम करणारी एक प्रभावी संस्था आहे.त्यांचे राष्टीय अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणेच्या मेहनतीला,चिकाटीला सलाम करावा वाटतो.कवींनी या व्यासपीठावर येऊन आपली कविता वाढवावी.काव्यमळा फुलवावा."
नक्षञांची धारदार कवींची बहारदार काव्यमैफल बी.आर.गाढवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.याचे सुञसंचालन संजीव शेरमकर यांनी केले. संमेलनाच्या दुसऱ्या
परिसंवादात कवितांची व्यासपीठे,कवी आणि काव्यनिर्मीती या विषयावर संपन्न झाला.यात कवयित्री शोभाताई कऊटकर-नागपूर,अॅड
.बाळासाहेब तोरस्कर-ठाणे यांनी आपले विचार दिलखूलास विचार व्यक्त केले.नवनवीन व्यासपीठाच्या माध्यमातुन कविता सादर करण्याची संधी मिळत असते.कविता लेखनास प्रेरणा मिळते.काव्यनिर्मिती होऊन काव्यक्षेञात यश मिळविता येते.काव्यमंचसारख्या अशा व्यासपीठांची आवश्यकता असल्याचा सुर परिसंवादातुन उमटला.
समारोपाच्या सञामध्ये महाकाव्यसंमेलन अध्यक्ष लोककवी डाॅ.विठ्ठल वाघ यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली.त्यांनी कवींना लेखन,सादरीकरण,निर्मितीबद्दल सखोल मार्गदर्शन केले.सुप्रसिदध कविता काळ्या मातीत मातीत सादर करुन रसिकांची मने जिंकली.प्रकटमुलाखत शोभा कऊटकर,अॅड जयराम तांबे व कवी वादळकार यांनी घेत डाॅ. विठ्ठल वाघांना मुलाखतीतुन बोलते केले होते.नक्षञाचं देणं काव्यमंच तर्फे विठ्ठल वाघ यांना एकवीस हजार रु ची मानधन थैली,मानपञ,स्मृतीचिन्ह,शाल,
श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
तर डाॅ विठ्ठल वाघांच्या शुभहस्ते सहभागी प्रत्येक कवी कवयिञी स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले, हा सर्वांसाठी आनंददायी प्रसंग होता. भूक तहान विसरून स्वयंस्फुर्तपणे दूरवरून अनेक खेड्यातुन कवी कवयिञी मोठ्यासंख्येने उपस्थित होते, हे काव्यमंच चे संघटीत यश आहे. येणाऱ्या सर्वांना काव्यमंच तर्फे निवास व भोजन व्यवस्था विनामूल्य व्करण्यात आली होती. भविष्यातील योजनामध्ये
भव्य महाकाव्यलायब्ररी उभी करणे,नक्षञ चॅनेल सुरु करणे,मासिक सुरु करणे,कविंना पेन्शन योजना सुरु करणे,एस.टी.,रेल्वे प्रवासात पन्नास टक्के सवलत इ. यावर सविस्तर चर्चा करण्यात येऊन अनेक ठरावांची मांडणी करण्यात आली. समारोप पसायदानाने करण्यात आला.
नक्षत्राचं देणं काव्यमंच नी केलेली मेहनत ,नियोजन कौतुकास्पद होते , हे अनुभवाला आहे.
हर आदमी है कवी ! जीवन बनता काव्य से ! जैसी निगा , वैसेही वे ! सव्य से या अपसव्य से !!...ह्या राष्ट्रकवी श्रीतुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या अमर अश्या काव्यपंक्ती आहे, कवितेची समर्पित भावनेने सेवा करणाऱ्या तमाम मान्यवरांना उर्जा देणाऱ्या आहेत .
अश्याच ध्येयाने बालपणापासून प्रेरित आपले मित्रवर्य वादळकार प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी स्थापन केलेल्या ह्या "नक्षत्रांच देणं काव्यमंच " ला मी कळमेश्वर जि.नागपूर येथे नोकरी च्या निमित्ताने वास्तव्याला असताना २००० साली जुळलो होतो . तेव्हापासून अनेक उपक्रमात मी सहभागी झालो आहे. दरवर्षी भोसरी पुणे येथे होत असलेल्या श्रावणी काव्यमैफिलीत सहभागी होत असे तर आम्ही घेत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राज्यस्तरीय साहित्य संमेलनात
प्रा.राजेंद्रजी उत्स्फुर्तपणे सहभागी होत असे. असा आमचा सहप्रवास सुरू आहे . काव्यमंचचा विस्तार त्यांनी वाढविल्यामुळे कवी आणी मित्र म्हणून राज्य समन्वयकाची जबाबदारी माझेकडे सोपविली. मंचाच्या माध्यमातून अनेक कवी - कवयित्रीना जोडण्याचे कार्य मी सुरू ठेवले आहे. सामुदायिक प्रयत्नांने पुर्व विदर्भातील गडचिरोली - चंद्रपूर जिल्ह्यासारख्या नक्षलग्रस्त आदिवासी दुर्गम भागात काव्यमंचचा विस्तार झाला. त्यामुळे मला झाडीपट्टीच्या अनेकांना जोडता आले. कळमेश्वर येथे संपन्न झालेल्या नक्षत्र महाकाव्यसंमेलनात मी सहभागी झालो होतो . ह्या संमेलनाचे अध्यक्ष होते प्रा.इंद्रजित भालेराव तर स्वागताध्यक्ष सुनिल नाथे होते . सुनिलभाऊ उद्योजक आहे. त्यांनी ह्या संमेलनाकरीता खूप मेहनत घेतलेली होती . संस्थापक प्रा. राजेंद्रजीची तळमळ , कामाप्रती निष्ठा , संघटन कौशल्य कौतुकास्पद आहे,अनेकांना उर्जा देणारे आहे.
राज्य समन्वयक म्हणून अनेक भागात मी गेलो आहे. कवी हे वेगळेच रसायन असते, हे मी अनुभवले. मानवी जीवनातील रहस्य , लोकरिती ,लोकपरंपरा यात आलेला अनैतिकपणा कवी शब्दरूपी प्रतिके, रूपक, अलंकाराचा वापर करून लोकजागर करीत असतो. काही लोक कविता जगतात आणि सांगतात ते माझ्या मते श्रेष्ठ दर्जाचे कवी होय . पण जे नुसते काव्यवाचन - लेखन करतात पण त्याप्रमाणे जगण्याचाही थोडाफार प्रयत्न करीत नाही ते कवी नव्हेत ,तर ती नुसतीच" काव- काव " समजावी.
वास्तविक कवीच्या लेखनातून भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनाच्या दृष्टीने विचार यायला हवेत . त्यांच्या लेखनातून समाजात अद्वैतभावना , हक्काची आणि जबाबदारीची जाणीव निर्माण झाली पाहिजेत . अहिंसेचा पाया अद्वैतभावना आहे,हे लक्षात घेणे गरजेचे असून आज समाजमनात सदभाव आणि बंधुभाव निर्माण करण्याची जबाबदारी सर्व कवींची आहे. अलिकडे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज , संत नामदेव , राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांसारखे श्रेष्ठ संत कवी नसल्यासारखे आहे. ती जबाबदारी आजच्या कवी मंडळींनी निश्चितपणे स्विकारावी.
नक्षत्राचं देणं काव्यमंच आता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पोहचलेले आहे. जिल्हा - विभाग स्तरावरील पदाधिकारी मंडळी मंचाचा विचार गाव खेड्यात पोहचवित आहे. संघटनेची ही गुंफण वादळकार कवी राजेंद्रजी च्या संकल्पनेतून साकार झालेली आहे.
कवीच्या कार्याचा सन्मान व्हावा, त्यांना बोलते करावे, राज्यस्तरीय विचारपीठ उपलब्ध व्हावे , याकरिता हा काव्यमंच सातत्याने काम करते आहे....विनंती हिच आहे सर्वाना की, गटबाजीपासून दूर राहावे आणि अधिकृत सदस्य( आजीवन रू.२००० ) भरून इतर इच्छुकांकडून किमान द्विवार्षिक रू.५०० भरून घेऊन काव्यमंच चा विस्तार विशालकाय करावा , असे नम्रपणे सांगावेसे वाटते......
...बंडोपंत बोढेकर ग्रामगीताचार्य ,
राज्य समन्वयक
नक्षत्राचं देणं काव्यमंच ,पुणे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!