प्रभु विश्वकर्मा जयंती तथा लोहार समाज मेळावा.

प्रभु विश्वकर्मा जयंती तथा लोहार समाज मेळावा.

मुल (प्रकाश चलाख)

मूल तालुक्यातील लोहार समाजाचे वतीने दिनांक 8 मार्च 2020 रोज रविवार ला ठीक ११.००वाजता ,स्थळ राम लीला भवन ,रेस्ट हाॅऊस रोड ,मूल. येथे प्रभु विश्वकर्मा जयंती उत्सव तथा लोहार समाज मेळावा आयोजित केलेला आहे .

मेळाव्यास मा.प्राध्यापक चरणदास बावणे, भंडारा, अध्यक्ष, वैदर्भीय गाडीलोहार व तत्सम जाती महासंघ, नागपूर.मा.श्री.मा.भा.पडघन,उपाध्यक्ष, वै.गा.व त.जाती महा. नागपूर मा.श्री. सुरेश मांडवगडे,गडचिरोली, सचिव वै.गा. तत्सम जाती महा.नागपूर इत्यादी पदाधिकारी,मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 मेळाव्यामध्ये शैक्षणिक,आर्थिक व सामाजिक या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन मान्यवर करणार आहेत.असे श्री गोविंदा सोनटक्के,अध्यक्ष,लोहार समाज संघटना तालुका, मुल यांनी कळविले आहे.

तरी मुल तालुक्यातील बहुसंख्य सर्व लोहार समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे कळविण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!