दिवंगत राधाबाई नवघरे यांना ग्रामगीता पध्दतीप्रमाणे आदरांजली संपन्न

दिवंगत राधाबाई कृष्णराव नवघरे यांना ग्रामगीता तत्त्वज्ञानाच्या पध्दतीप्रमाणे आदरांजली कार्यक्रम संपन्न



दि.२५.१.२०२० रोजी विश्वकर्मा सुतार समाज भवन बालाजी वार्ड चंद्रपूर येथे श्रीमती आशाताई बुरडकर यांच्या मातोश्री दिवंगत राधाबाई कृष्णराव नवघरे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तालुकाप्रमुख विजयराव चिताडे यांनी प्रथमतः ग्रामगीता ग्रंथातील देवदर्शन ह्या अध्यायाचे वाचन केले. त्यानंतर ह्या अध्यायानुसार ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी ग्रामगीतेच्या ओव्याचे आधाराने मानवी जन्म -मृत्यू बाबत विश्लेषण केले. सूत्रसंचालन कार्तीक चरडे गुरूजी यांनी केले. तर सर्व मान्यवरांचे आभार आशाताई बुरडकर यांनी मानले. या आदरांजली कार्यक्रमास नवघरे व बुरडकर परिवाराचे सर्व नातेवाईक मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. ह्या कार्यक्रमाचे उपस्थित सर्वांनी कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!