मातोश्री विद्यालयात ग्रामगीता जीवन विकास परीक्षा संपन्न

वृत्त .....
मातोश्री विद्यालयात ग्रामगीता जीवन विकास परीक्षा संपन्न ....


चंद्रपूर (प्रतिनिधी )-
अ.भा.श्रीगुरूदेव सेवा मंडळ गुरूकुंज आश्रम द्वारा संचालित ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभागाच्या वतीने राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांच्या समग्र साहित्यावर आधारित परीक्षा दरवर्षी वेगवेगळ्या भागात घेण्यात येत असते.
ही परीक्षा सहा गटात घेण्यात येत असते , ह्या परीक्षेचे केंद्र गोंडवाना शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी प्रा. सुर्यकांत खनके यांच्या मार्गदर्शनात शहरातील सुप्रसिद्ध मातोश्री विद्यालयात घेण्यात आले होते. ह्या केंद्रावर शाळेचे मुख्याद्यापक संजय बिजवे , प्राथमिक मुख्याद्यापिका सौ. संध्या वाढई , पर्यवेक्षक प्रविण रोकमवार , सौ. स्मिता पाचपोर आदी शिक्षकवृंदानी ह्या परीक्षेचे उत्तम नियोजन केले होते . शहरातील सर्वात मोठे परीक्षा केंद्र म्हणून संचालित केल्याबद्दल ह्या केंद्राचे मार्गदर्शक प्रा. सुर्यकांत खनके यांचे ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी कौतुक केले आहे. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीक्षा विभागाचे विजय चिताडे आणि आण्याजी ढवस , आशाताई बुरडकर आदींनी सहकार्य केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!