पिपर्डा गाव झाले विज्ञानमय !



पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला  लागून असलेल्या आदिवासी बहुल पिपर्डा या गावामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने विज्ञान  मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम गावातील शिक्षणाग्रही लोकांनी जि. प. उच्च  प्राथ. शाळा पिपर्डा येथे दोन - तीन  दिवस जाऊन मुलांसोबत विज्ञान प्रयोगाविषयी कार्यशाळा घेतली.त्यानंतर आज दिनांक २८ फेब्रुवारी २०२० रोज शुक्रवारला विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले .या कार्यक्रमाचे उदघाटन  पां. र.कळाम(माजी सरपंच )यांनी केले.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष दयानंद पा. बोरकर (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष )हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून  विलास पा. बोरकर (शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष ), वामन पा. बोरकर (जगदंबा माता मंदिर अध्यक्ष ), विश्वनाथ मेश्राम (माजी उपसरपंच ), डॉ.पी. व्ही.  सहारे(जल स्वराज्य अध्यक्ष ),  धर्माजी आदे(माजी उपसरपंच),  तुकाराम खोब्रागडे (माजी तं.मु.स. अध्यक्ष ),  भारत भेंडारे (सामाजिक कार्यकर्ता ), नागसेन पाटील, भीमराव चुनारकर (पोलीस पाटील )सपना कुळमेथे,  आम्रपाली गेडाम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांनी भाषणात राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्व, त्याचा इतिहास आणि उद्देश सांगितले. त्याचबरोबर २०२० या वर्षातील 'विज्ञानमध्ये स्त्रिया' ही संकल्पना समजावून सांगितली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  घनश्याम खोब्रागडे तर प्रास्ताविक  योगेश खोब्रागडे यांनी केले. शेवटी आभार  शुभम चुनारकर यांनी  मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  मनोज खोब्रागडे, समीर मेश्राम, राजू  कळाम, यांनी खूप मेहनत घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!