वाघाच्या हल्ल्यात दोन गाई ठार
वाघाच्या हल्ल्यात दोन गाई ठार
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - वाघाच्या हल्ल्यात दोन गाय ठार जांभूळवीरा गाव परिसरात वाघाची दहशत पसरली असून खडसंगी वनपरिक्षेत्रात दिनांक.३०/०१/२०२० व ३१/०१/२०२० रोजी सलग दोन दिवस वनविकास च्या खडसंगी वनपरिक्षेत्रातील भिसी उपक्षेत्रातील मालगाव बिटात कक्ष क्रमांक. २० मधील राखीव वनक्षेत्रात वाघाने दोन गाईंना ठार केले असून संबंधित गाई मालकाचे नाव प्रभाकर लक्ष्मण गायकवाड राहणार जांभूळवीरा व मनोहर गोपाळ देहारे राहणार मिनजरी हे असून त्यांनी संबंधित प्रकरणात वनपरिक्षेत्र कार्यालय खडसंगी येथे रितसर अर्ज करून वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या गाईचे नुकसान भरपाई मिळण्याकरिता अर्ज सादर केले आहे.
संबंधित प्रकरणात खडसंगी वनपरिक्षेत्रातील वन परिमंडळ अधिकारी रमेश बलैया व आशिष बायस्कर क्षेत्र सहाय्यक भीसी उपक्षेत्र यांनी घटनास्थळावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून मोका पंचनामा व इतर दस्तऐवज तयार करून वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या गाईचे संबंधित अर्जदारास रीतसर शासकीय मदत मिळण्याकरिता वरिष्ठ कार्यालयात प्रस्ताव सादर केले आहे तसेच जांभूळविरा व इतर जवळपास गावातील लोकांना वनाधिकार्यांनी राखीव वनक्षेत्रात एकटे न जाण्याचे सूचना दिल्या आहेत सध्या वाघाचे अस्तित्व सदर क्षेत्रात असून त्यापासून काही उचित हानी होऊ नये म्हणून वनअधिकारी यांनी रात्र व दिवस गस्त वाढवली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!