५० वर्षाची वारंटी असलेल्या महामार्गाला ५० दिवसात पडल्या भेगा
जांभुळघाट - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
जांभुळघाट : - चिमुर ते भिसी मार्गे उमरेड जाणाऱ्या व राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई या रोड चे काम सुरु असून.या रोडची वारंटी ही ५० वर्षाची आहे.पण त्या महामार्गाला ५० दिवसातच भेगा व गड्डे पडायला सुरुवात झाली. चिमूर भिसी ते उमरेड सिमेंट रोड चे काम झाले असून काही दिवसातच भेगा पडायला लागल्या व पुर्ण पणे या रोडचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून.या रोडची देखरेख हे अभियंता यांच्याकडे असते पण ते अभियंता रोडच्या कामाची देखरेख न करता ते फक्त कंत्राट दाराची देखरेख करीत असतात. हे अभियंता फक्त कंत्राटदाराच्या AC च्या गाडीवर बसुन देखरेक करीत असतात. आणि फाईस्टार हॉटेल मध्ये कामाचा आनंद लुटत असतात नंतर कामाच्या फाहील वर सही मारून बिल पास करीत असतात.यामुळे महामार्गाचे व रोडाचे किंवा इतर काम हे निकृष्ट दर्जाचे नेहमी होत असतात . त्या कंत्राटदार ठेकेदार व अधिकारी यांना लोकप्रतीनीची धाक तर नाही असा ? जनते मध्ये संभ्रमत निर्माण होतांना दिसत असून महामार्गाच्या व रोडच्या कामात भ्रष्टाचार आढळल्यास डोजर खाली दाबण्यात येईल असे वक्तव्य राजमार्ग , जहाजराणी , जल संधारन , नदी विकास आणि गंगा संरक्षण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले या दिलेल्या घोषणाबाजी चा खरोखरच पालन होईल का ? याकडे जनतेचे लक्ष वेधू लागले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!