राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन

..
श्रीगुरूदेव श्रमश्री पुरस्काराने नंदू पिंपळकर सन्मानित
------------------ पेंढरी (कोके) (प्रतिनिधी ) -

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती द्वारा आयोजित सतराव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलनात नंदू पिंपळकर यांना श्रीगुरूदेव श्रमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोख रक्कम , मानपत्र आणि गौरवचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते . संमेलनाच्या समारोप प्रसंगी  चंदू पाटील मारकवार आणि डाॕ. नामदेव कोकोडे यांच्या हस्ते प्रस्तुत पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी परिषदेचे भाऊराव बोबडे , ॲड. राजेंद्र जेनेकर , सतिश लोंढे , सुनिल नाथे,  पुण्याचे  गोवंश अभ्यासक पंढरीनाथ चंदनखेडे ,    मधुकर मडावी  ,   विलास चौधरी ,  विलास उगे , संजय वैद्य , प्रा. श्रावण  बानासुरे,  चंद्रकांत शिंदे,  नाना डोंगे , मोहन मेश्राम , कार्तिक चरडे, मधुसूदन दोनोडे , रवि बोबडे , सौ. डाॕ.माधुरी
कोकोडे 
श्रीकांत प्रतापवार  आदी उपस्थित होते . हा सन्मान दिवंगत यशवंत बोबडे  स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी संमेलनात प्रदान करण्यात येतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!