भिसी येथे रेती तस्करांकडून शेतामध्ये अवैध रेती साठा जमा करणे सुरू

भिसी येथे रेती तस्करांकडून शेतामध्ये अवैध रेती साठा जमा करणे सुरू


महसुल अधिकारी व वनविभागाचे याकडे दुर्लक्ष


जांभुळघाट - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

जांभुळघाट : - चिमुर तालूक्यातिल भिसी येथे रेती तस्कराकडून शेतामध्ये अवैध रेती साठा जमा करून ठेवण्यात येत आहे.हे बऱ्याच दिवसापासुन सिरसपुर व नवेगाव नाल्यातुन रात्रोला ट्रॅक्टर द्वारे रेती तस्करी होत आहे.हे ट्रॅक्टर भिसी वरून येत असतात.रात्रभर रेती तस्करी करीत असतात. तरी सुध्दा महसुल विभाग व वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत असतांना दिसत आहे. हि रेती वनपरिक्षेत्रातून काढली जात असून याकडे महसूल
तथा वनविभाग असे दोन्ही विभागाचे अधीकारी याकडे कानाडोळा करीत आहे. यावर आढा बसनार काय ?  नागरीकांना पडला आहे.यांची सुचना महसूल अधिकारी यांना देऊन सुध्दा याकडे दुर्लक्ष करीत आहे.लाखोच्या महसुलावर रेती तस्कर हात साफ करीत आहे. या रेती तस्करावर कारवाई अधिकारी का करीत नाही. हा एक गुढ रहश्य बनलेला आहे.या रेती तस्करावर महसुल व वन विभागाने त्वरीत कारवाई करावी.अशी चर्चा जनता करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!