रंगरंगोटीने सजले मोहर्लीचे बसस्थानक .

रंगरंगोटीने सजले मोहर्लीचे बसस्थानक 

चंद्रपूर (प्रतिनिधी )

मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील  ग्रामपंचायत मोहर्ली  येथिल बस स्थानकाची  रंगरंगोटी प्रवाश्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली  आहे.

मुख्यमंत्री ग्रामप्रवर्तक म्हणून  रोशन दुर्गे कार्यरत असून त्यांच्या कल्पकतेने येथे बसस्थानकाची रंगरंगोटी करण्यात आली आहे.  ग्रामपंचायत मोहर्ली हे गाव मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत समाविष्ट असून  विविध सामाजिक आणि भौतिक सोईसुविधा गावातील लोकांना उपलब्ध व्हावे आणि गावाचा सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. 

त्याअंतर्गत ग्राम विकास अभियान  मार्फत गावातील बस स्थानक आणि ग्रामपंचायत इमारतीची रंगरंगोटी  प्रवाशांचेआणि पर्यटकांचे मन आकर्षून घेत आहे.मोहर्ली हे गाव ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेश  द्वार असल्यामुळे अनेक पर्यटक येथे नेहमीच  येत-जात असतात.त्यामुळेच बस स्थानकाची नैसर्गिक रंगरंगोटी ही पर्यटकांच्या दृष्टीने आवश्यक होती.सदर योजना ही 20 हजार रूपये खर्चून  ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या  निधीतून करण्यात   आले  आहे . त्यामूळे प्रवाश्यांना आधी होत असलेली  गैरसोय आता दूर झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!