चिमूर शहरात खळबळजनक घटनेची चर्चा सुरू

चिमूर शहरात खळबळजनक घटनेची चर्चा सुरू


विनापरवाना २० टक्के आकारण्यात आलेल्या दरामुळे एका इसमाने स्वतःला गळफास लावून संपविण्याचे केले प्रयत्न


चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चिमूर : - चिमूर शहरातील गुरुदेव वार्ड येथील फारुख खॉं पठाण यांनी ०८/११/२०१९ शुक्रवार ला दुपारी ४ ते ५ वाजताच्या दरम्यान  स्वतःला स्वतःच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला.हि बाब त्यांची पत्नी सौ.गुलनाज फारूक खॉं पठाण हि त्यांच्या माहेरी आई वडिलांकडे इंदिरा नगर येथे गेली होती.व नंतर स्वतःच्या घरी परत गेली असता घरा बाहेरून घराचे दार आतून बंद होते परंतु दाराला दोरी व तात्पुरत्या स्वरूपाची कडी लावत असल्याने एकदम जोरात दाराला ठोकल्याने दार उघडले व अचानक दोराने फाशी लागलेल्या पतीला बघून घरा बाहेर आरडा - ओरड करून घरा शेजारील जनता त्या ठिकाणी उपस्थित झाली व गळफास घेतलेली दोरी कापून चिमूर येथील उप जिल्हा रुग्णालय पती फारुख खॉं पठाण ला उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्यांची परिस्थिती अतिशय चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी काही वेळातच मोठ्या रुग्णालयात दाखवावं लागते म्हणून रेफर दिलं त्यानंतर नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असून गळफास जी फारुख खॉं पठाण यांनी का घेतली असावी ? अशी चर्चा चिमूर शहरात सुरू झाली. व हि गळफास व्याजाने घेतलेल्या पैशामुळे झाली अशी गळफास घेतलेल्या पुरुषाच्या पत्नीने चिमूर पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली व या तक्रारीत २०% व्याजाने काही पैसे घेतले गेले होते परंतु ते पैसे परत दिल्या नंतर आणखी तेवढेच पैसे तुमच्यावर व्याज शिल्लक आहे असे बोलल्या गेले.अशी तक्रार नोंदवली आहे व व्याजाने घेतलेल्या पैशांवर आकारलेले २० टक्के दराच्या करामुळे त्या त्रासाने व्याजाने घेतलेली रक्कम परत होई नासे झाल्याने व्याजाने पैसे देणाऱ्या व्यक्ती कडून पैसे परत कधी देणार याकरीता वारंवार त्रास दिल्याने पैसे देणाऱ्या व्यक्तीने फारुख खॉं पठाण ला लवकर पैसे परत कर नाहीतर तुझे हात पाय तोडन्याची धमकी दिली व घरात घुसून मारहाण करेल अशी सुद्धा धमकी दिली असल्याने व पैसे देऊन सुद्धा परत त्रास देत असल्याने या त्रासास कंटाळून स्वतःला गळफास लावून आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले व तो इसम आज अखेरच्या घटका नागपूर येथील प्रायव्हेट रुग्णालयात घेत असून चिमूर शहरात सध्या मोठ्या प्रमाणात ९ दिवसांपासून चर्चा प्रत्येक पान टपरी - चाहा टपरी तसेस चौका - चौकात सुरू झाली आहे.या संपूर्ण घटनेची तक्रार चिमूर पोलीस स्टेशन ला दिली असून या घटनेचा पुढील संपूर्ण तपास चिमूर पोलिस स्टेशन करीत असून अशा विना परवाना व्याजाने पैसे देणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय असून याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!