व्ही. डब्ल्यू टिपले यांची नागपूर विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर अशासकीय सदस्य म्हणून निवड
व्ही. डब्ल्यू टिपले यांची नागपूर विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर अशासकीय सदस्य म्हणून निवड
शंकरपूर (जगदीश पेंदाम)
येथील विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य टिपले यांची नागपूर विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
मागील 32 वर्षांपासून ते विकास कनिष्ठ महाविद्यालय येथे मराठी विषयाची अध्यापन म्हणून कार्य करीत आहे त्यांना जुलै 2016 मध्ये प्राचार्य म्हणून बढती मिळाली असून ते एक विद्यार्थीप्रिय, शिस्तप्रिय शिक्षक म्हणून संपूर्ण परिसरात ओळख आहे.
तसेच प्रथम पासून भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून राजकारणात सक्रिय आहे. त्यांनी भाजपा मध्ये आतापर्यंत तालुका उपाध्यक्ष, संघटक व जिल्हा उपाध्यक्ष पद भूषवले आहे. त्यांच्या निवडीबद्दल आमदार किर्तिकुमार भांगडीया, अविनाश बारोकर, अनिल शेंडे, नारायण चौधरी, रामेश्वर, सावसाकडे, विलास राकडे वासुदेव मदन जगदीश श्रीरामे, जगदीश पेंदाम, महाविद्यालय शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!