पावसामुळे घराची पडझड.


सततच्या पावसामुळे घरांची पडझड 

 प्रशासनाकडून आर्थिक मदतीची मागणी .

 मुल ( प्रकाश चलाख)

 तालुक्यात गेल्या आठवड्यापासून होत असलेल्या सततच्या पावसामुळे तालुक्यातील अनेक नागरिकांच्या घरांची पडझड झाली असून नुकसानग्रस्त नागरिकांनी प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

 गेल्या आठवड्यापासून  तालुक्यात  पावसाची रोज हजेरी असून होत असलेल्या सततच्या पावसामुळे तालुक्यातील अनेक   नागरिकांच्या घरांची पडझड झाली  आहे .  सतत होत असलेल्या पावसा मुळे   अनेक नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. तर काही नागरिकां चे पावसामुळे घर जमीनदोस्त झाले आहे .  त्यामुळे अनेक नागरि कानी पावसाळ्यातच आपला निवारा गमावला असून आर्थिक मदतीची याचना प्रशासनाकडे केली आहे.

  मुल येथील अजय प्रभाकर ठाकुरवार  (मानी मोहला) वॉर्ड न 1 यांचे राहते मकान काही दिवसांपूर्वीच सततच्या पावसाने पडले .त्यांनी संबंधित विभाग अधिकारी यांच्याकडे आर्थिक मदतीसाठी मोका चौकशी करून अहवाल सादर केला .परंतु अजून पर्यंत ही त्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. चहा विक्री करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांवर निवारा गमावल्याने आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

 तालुक्यातील हळदी येथील रामदास देवाची भुरसे  यांच्या पावसाने घराचे नुकसान झाले. त्यांनीही प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

 प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर मोका चौकशी करून अहवाल सादर करण्यास, आर्थिक मदत मिळण्यात होत असलेल्या दिरंगाईबद्दल नुकसानग्रस्त नागरिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तरी आर्थिक मदत मिळावी अशी नुकसानग्रस्त नागरिकांनी विनंती केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!