वंचित बहुजन आघाडीची बैठक
वंचित बहुजन आघाडीची बैठक
पोंभुर्णा :- जवाहर धोडरे
पोंभुर्णा तालुक्यातील भा.रि.प.बहूजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीचे सर्व तालुका पदाधिकारी, युवा पदाधिकारी , महिला पदाधिकारी , सर्कल पदाधिकारी , ग्राम शाखा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची महत्वपूर्ण बैठक दिनांक 25/08/2019 रोज रविवार ला आयोजित करण्यात आली आहे.
ठीक १-००वाजता तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रम तथा
अती महत्वाच्या विषयावर चर्चा
करण्याकरिता सभेचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्व शाखेच्या पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी न चुकता हजर राहावे असे आवाहन करण्यात आले असून या
सभेचे अध्यक्षस्थानी रामरावजी चव्हाण ,जिल्हा अध्यक्ष ,चंद्रपूर हे राहणार आहेत.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. धिरज बांबोडे ,जिल्हा महासचिव , मा. श्याम कुमार गेडाम जिल्हा महासचिव , मा. रत्नाकर रामटेके, जिल्हा संगठक चंद्रपुर हे मार्गदर्शन करतील.
बैठकीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकी बाबत चर्चा करणे,
जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी करण्या संदर्भात चर्चा करणे,
अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय यावर चर्चा होईल. तरी सर्व कार्यकर्त्यांनी माळी समाज सभागृह,पोंभुर्णा येथे उपस्थित रहावे असे आवाहनभारिप बहुजन महासंघ
वंचित बहुजन आघाडी
ता.पोंभुर्णा तर्फे करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!