राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर होत असलेल्या अवैध वाहतुकीकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष महामार्गावर असणारी अवैध ट्राफिक हटवा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष योगेश ठुने यांची मागणी

राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर होत असलेल्या अवैध वाहतुकीकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

महामार्गावर असणारी अवैध ट्राफिक हटवा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष योगेश ठुने यांची मागणी



चिमूर -  प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )


चिमूर : - दिनांक.२३/०८/२०१९ चिमूर ते वरोरा जाणारा ३५३ ई हा राष्ट्रीय महामार्ग असून या महामार्गावर प्रत्येक शुक्रवारला महामार्ग अडवून आठवडी बाजार भरवला जातो हे अनेक वर्षांपासून चिमुर शहरातील प्रथाच झाली आहे. पण याच प्रथेचा चिमुरातील वाहतुकीवर खूप मोठा परिणाम पडत आहे. सामान्य माणूस रस्त्याने जात येत असले तरी त्याला त्या अवैध वाहतुकीचा खूप मोठा त्रास होत असून याकडे चिमूर वाहतूक पोलीस हेतू परस्पर दुर्लक्ष करीत आहेत. या महामार्गावरील अवैध वाहतूक ही तात्काळ हटवावी व सामान्य माणसाला होत असलेला त्रास कमी करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष योगेश ठुने  यांनी केली.
     तहसील कार्यालयाच्या व बस स्थानकाच्या समोर नो पार्किंग झोन २०० मीटर च्या आत अवैध प्रवासी वाहतूक करू नये असे ।नियम असून रोज अवैध वाहतूक करीत असलेले ट्रॅव्हल्स तसेच ट्रक्स चे अवैध धंदे नो पार्किंग च्या आवारात जाऊन अवैध व्यवसाय करीत आहे हे रोजच होत असून वाहतूक पोलिस आपल्या डोळ्यांनी बघून काना डोळा करीत असतात.या त्रासाने मागील काही दिवसा अगोदर आगार प्रमुख यांनी अवैध वाहतूक करण्याऱ्यावर चिमूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती पण त्याकडे अजूनही पोलीस दुर्लक्ष करीत असून त्यांच्यावर काहीही कार्यवाही चिमूर पोलिसांनी केली नाही. व उलट डोळ्याच्या समोर होत असलेल्या अवैध वाहतुकीला डोळ्याने पाहून काहीही न बोलता फक्त डोळ्यांनी पाहाचे काम चिमुर वाहतूक पोलीस करीत आहेत.    
     तहसील कार्यालयाच्या समोर रस्त्याचे खोदकाम केले  असून रस्ता खोदून ठेवला आहे पण त्या कामाला अजून पर्यंत सुरवात झाली नाही व आता त्या ठिकाणी अवैध वाहतूक करणाऱ्यानी आपल्या खाजगी गाड्या लावून रस्ताच आपल्या नावाने केला आहे. असे चित्र वाहतूक पोलीसांच्या समक्ष आढळून येत आहे तरी वाहतूक पोलीस काहीही बोलू शकत नाही. असे का ? त्याचा फटका फक्त सामान्य माणसालाच का ? याचे उत्तर वाहतूक पोलीस उडवा - उडव करीत उत्तर देत आसतात जर या वाहतूक कोंढित एखादी रुग्णवाहिका आली तर त्या रुग्णवाहिकेला रस्ता कुठून मिळेल हा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होत आहे व चिमूर शहरात मोठ्या  प्रमाणात वाहतूक पोलीस कार्यरत असताना सुद्धा अशा प्रकारची वाहतूक कोंढी निर्माण होत आहे. हि आश्चर्याची बाब दिसून येत आहे. याकडे (R.T.O) ने लक्ष देण्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!