बंधारे बांधण्यांच्या आंदोलनात कॉग्रेस फुटीचेे दर्शन

बंधारे बांधण्यांच्या आंदोलनात कॉग्रेस फुटीचेे दर्शन
मूल (अमित राऊत)
विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेसच्या वतीने बंधारे बांधाच्या आंदोलनात मूल तालुक्यातील कॉंग्रेसच्या गटबाजीचे दर्शनच दिसून येत असल्यांने राजकीय वर्तुळात हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला आहे.
मागील तीन दशकापासून जिल्हयातील गटबाजीने भाजपाला अच्छे दिन आणून दिले. आता तर, जिल्हयात कॉंग्रेस रसातळाला जात असल्यांचे चित्र असले तरीही गटबाजी मात्र कायम आहे.  मूल तालुक्यात स्व. वामनराव गड्डमवार नंतर, नरेश पुगलीया गटाचे वर्चस्व होते.  मात्र बाबूचे त्या काळचे खास चेहरे आता दिवसा वड्डेट्टीवार गटात आणि रात्रौ वाड्यांचे वर्तुळात वावरणारे नेते तयार झाल्यांने, तालुक्यात भाजपाची सत्ता असली तरी, या सत्तेला केवळ दिखावू विरोधकच शिल्लक राहीले.  मागील नगर परिषदेच्या निवडणूकीत तर, कॉंग्रेसची इज्जत वाचविण्यांचे काम विनोद कामडे या एकमेव नगरसेवकांनी केली होती.  या निवडणूकीतही कॉंग्रेस केवळ दिखाव्यासाठीच लढल्यांची आणि कॉंग्रेस नेत्यांची भाजपा नेत्यांसोबत 'सेटिंग' झाल्याचीच चर्चा होती.  एकीकडे शरीराने ठेकेदारीसाठी कॉंग्रेसकडे असणारे नेते असल्यांने, या नेत्यांनी संघर्षातून पक्ष वाढविण्याऐवजी नरमाईच्या भुमीकेमुळे भाजपाला विनासायस सत्ता मिळणे सोईचे झाले.  या पार्रश्वभूमीवर माजी खासदार नरेश पुगलीयांनी विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेसच्या वतीने मूलच्या उमा नदीवर बंधारे बांधण्यांचा आंदोलन जाहीर केले.  या आंदोलनातील प्रचार पत्रकावर, फ्लेक्स बोर्डवर तालुक्यातील कॉंग्रेसचे बडे नेते, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक संतोष रावत, मूल तालुका कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष घनश्याम येनूरकर, मूल पंचायत समितीचे सदस्य संजय मारकवार, युवा नेते राकेश रत्नावार यांचे फोटो अगर नावही नाही.  याबाबत आमचे प्रतिनिधीने त्यांचेशी बातचित केली असता संजय मारकवार यांनी, हा बंधारा याआधीच मंजूर झालेला असल्यांने तेथे जाणे चुकीचे ठरेल असे मत व्यक्त करीत आपण या कार्यक्रमाला जाणार नसल्यांचे सांगीतले तर, तालुका अध्यक्ष घनश्याम येनूरकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
दुसरीकडे पुगलीया गटाचे नेतृत्व मूल तालुक्यातील कॉंग्रेसचे जेष्ठ नेते देवराव चिमड्यालवार, चंद्रकांत पुरम, माजी जि.प. उपाध्यक्ष विनोद अहिरकर,  विजय चिमडयालवार, प्रकाश कागदेलवार, प्रकाश गांगरेड्डीवार, नगरसेवक विनोद कामडी, अशोक आक्केवार, निलेश रायकंटीवार, वैशाली पुल्लावार, मंगला आत्राम करीत असून, मोठे कॉंग्रेस भवन असतांनाही प्रकाश कागदेलवार यांचे जागेत कॉंग्रेसचे नवे कार्यालय उभे होत असल्यांने, बंधारे बांधण्याच्या कार्यक्रमात कॉंग्रेस फुटीचे चित्र मूल शहरात काॅंग्रेसला 'अच्छे दिन' आणील काय? याचीच चर्चा सुरू आहे.
पक्षासोबत राहणार - विनोद कामडी
नगर परीषद मूल येथिल काॅंग्रेसचे एकमेव नगरसेवक विनोद कामडी यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की,
नेते कुणीही असो जिथे काॅंग्रेस पक्षाचा कार्यक्रम, आंदोलन असेल तिथे  तिथे मी राहणार.