गावात शिरून वाघानी बैलांला केले ठार !

पोंभूर्णा (जवाहर धोडरे)

तालुक्यातील घोसरी येथील तेजूराव राघोबा पोरटे यांचे मालकीचे जनावरे घराबाहेर चिंचेच्या झाडाजवळ बांधून असताना रात्रौला पट्टेदार वाघाने बाकड व गो-हा यांना ठार केल्याने गावामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

          पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत स्थानिक बिटामध्ये पट्टेदार वाघाचा वावर असून पाळीव जनावरांना फस्त करीत आहेत. यापूर्वी बेंबाळ येथील गाय आणि  बैलाला ठार केले. नुकताच काटवन येथे कळपावर हल्ला केले, बचावासाठी पुढे सरसावलेल्या पुठ्ठावार या मेंढपाळाला ठार केले.

         घोसरी उपवन क्षेत्रात वाघाने धुमाकूळ घातला आहे. वाघाने पाळीव  प्राण्यांचा बळी घेत असून दि. ३० जानेवारी ला रात्रौ घराजवळच चिंचेच्या झाडाजवळ नेहमीप्रमाणे गुरे बांधून असलेल्या तेजूराव पोरटे यांच्या गोरा व बाकडाला वाघाने ठार केले. वाघाने गावामध्ये शिरकाव करून पाळीव जनावरे फस्त करीत असले तरी वनप्राणी - मानव संघर्ष वाढण्याची शक्यता दिसत आहे.

         सद्या थंडीने कहर केला असल्याने गावकरी घरातच पांघरून घेतलेले असतात. त्यामुळे सदर घटना सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना  दिल्यानंतर लागलीच घटनास्थळी दाखल होवून पुढील कार्यवाही क्षेत्र सहायक पालीकोंडावार करीत आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!