दारू, घरफोडी, सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे
घरफोडी, सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे
मागील काही दिवसापासून मूल तालुक्यात पोलिस प्रशासन अस्तित्वात आहे काय? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सैराट झालेले अवैद्य दारू विक्रेते आणि त्यावर ज्यांनी अंकुश लावायला पाहिजे असे पोलिस यांच्या छुप्या युतीने आता उघड स्वरूप धारण केल्याने कधी नवहे एवढी आराजकता मूल शहर अनुभवत आहे. फरार अवैद्य दारू विक्रेते पोलिसांना फोन करून ''में नही बेचुंगा तो किसीको नही बेचने दुंगा'' असे उघड बोलत आहे. एवढी दयनिय परिस्थिती यापुर्वी झाल्याची ऐकवीत नाही. चंद्रपूरच्या पोलिसांना मूल येथील अवैध दारू साठयांची माहिती मिळते आणि ते यशस्वी कार्यवाही करतात. यावरून मूलच्या पोलिसांचे त्या अवैध दारू विक्रेत्यांसोबत घट्ट आर्थिक संबंध असावेत किंवा ज्यांनी चंद्रपूरच्या पोलिसांना ही माहिती दिली त्यांचा मूल पोलिसांवर विष्वास.
मागील काही दिवसापुर्वी एकाच दिवषी तब्बल तीन घरफोड्या झाल्या. घरफोड्या सगळीकडेच होत असते त्यात वेगळे काही नसले तरी चक्क उपविभागीय पोलिस अधिकाÚयांच्या घरातही चोरी झाली ही बाब पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. सोबतच घरफोड्यांची बेडर वृत्तीही दिसून येते. एवढ्या गंभीर प्रकरणाचा बोध मूल पोलिसांनी घेतला नाही. आणि त्याची परिणीती अशी झाली की, त्याच परिसरामध्ये दरोडे खोÚयांनी पुन्हा घरफोडी केली. मूल पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सामान्य नागरिकांचा विश्वासच न राहिल्याने त्यांना पोलिसात तक्रार देण्याची गरज वाटली नाही.
शहरातील गुन्हेगारीवर आळा बसावा यासाठी राज्यातील सर्वाधिक आधुनिक असलेली ‘सर्वेलन्स सिस्टम’ म्हणून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. हे कॅमेरे मेन्टनन्स अभावी महिने न महिने बंद असतात. अवैध दारू विक्रीच्या किंवा चोरीच्या घटना होत असतांना या सीसीटीव्ही कॅमेराला बॅनरही चहुबाजूने झाकून टाकले आहे. याचाच अर्थ गांधी चौकातील कोणतीही ‘मुवमेंट’ सीसीटीव्ही कॅमेरे टिपत नाही आणि सबंधितांनाही ते दिसत नाही. यातच काय ते समजावे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!