सोनझरी च्या आदिवासीना ५० वर्षानंतर रेशन कार्ड


सोनझरी च्या आदिवासीना ५० वर्षानंतर रेशन कार्ड

सोनझरी आदिवासीना तब्बल ५० वर्षानंतर रेशनकार्ड मिळवून देण्यात श्रामिक एल्गार ला यश मिळाले.
मागील अनेक दशकापासून सोनझरी आदिवासी समाजाचे कुंटूब बाबुपेठ परिसरात राहतात. मात्र यांचेकडे कुणाचेही लक्ष नसल्याने त्यांचे मूलभूत प्रश्नही सुटले नव्हते. चार महिण्यापूर्वी श्रामिक एल्गार ने
जिल्हाधिकारी कार्यालयावर संघटनेच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे नेतृत्वात मोर्चा काढून त्यांचे प्रश्न प्रशासनापुढे मांडले होते. या समाजातील कुटूंबाकडे रेशन कार्ड नसल्यांने त्यांना सवलतीच्या दरात रेशन मिळत नव्हते शिवाय ​रेशन कार्ड अभावी अनेक शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागत होते. मोर्चानंतर, श्रमिक एल्गारची कार्यकर्ती बिंदू गडलिग, दिवाकर सिडाम यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा करून, येथील रहीवासींना आज रेशनकार्ड मिळवून दिले. आपल्या हातात रेशन कार्ड घेत सोनझरी येथील आदिवासी महिलांनी आनंद व्यक्त केला. श्रमिक एल्गारच्या महासचिव छाया सिडाम यांनी या आदिवासी कुटूंबियांना अन्न सुरक्षेचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाकडे मागणी केली आहे.