मूल शहरात सुलतानी घरटॅक्स
नागपूर महापालिकेपेक्षा मूल नगर परिशदेचा घरटॅक्स दुप्पट
बेकायदेषीर घरटॅक्सची बळजबरीने वसूली: जनतेत असंतोश!
मूल (वार्ताहर)
मूल नगर परिशदेने स्वतःच घरटॅक्स वाढीचा ठराव घेतला. तब्बल चारपट करवाढ झाल्यांने जनतेत असंतोश निर्माण झाला. जनता सत्तेच्या विरोधात जाईल ही भिती निर्माण झाल्यांने डिसेंबर 2015 मध्ये हा ठराव रद्द केला. ठराव रद्द केल्यांचे तत्कालीन सर्व नगरसेवकांनी श्रेयही वाटून घेतले. यामुळे मागील वर्शी जुन्याच दराने मालमत्ता कराची वसूली करण्यात आली. नगर सेवकांनी घेतलेला ठराव रद्द करण्यात यावा यासाठी मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांचेकडून प्रस्ताव मंजूर करवून घेतला व नोटबंदीच्या काळात, नगर परिशद निवडणूकीच्या काळात नागरीकांच्या गरजेचा फायदा घेत वाढीव दराने वसूलीही सुरू केली.
नगर परिशदेने मालमत्ता करात प्रचंड वाढ केल्यांने, सामान्य नागरीकांत असंतोश निर्माण झाला आहे. करवाढीस कोणाचेही विरोध नाही, मात्र करवाढ करतांना, नगर परिशदेने घेतलेल्या ठरावाला बाजूला ठेवून, मालमत्तेचे योग्यरितीने मुल्यांकन न करताच ही वाढ केल्यांने अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जानकारांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर महानगर पालिका तसेच चंद्रपूर महानगर पालिकेच्या हद्दीतील घरांना सरासरी दोन रूपये प्रति स्केअर फूट घरटॅक्सची आकारणी होत आहे. हाच दर मूल षहरात मात्र चार रूपयापेक्षाही अधिक लागत आहे. याचाच अर्थ 1000 स्केअर फुटाचे घराला नागपूर-चंद्रपूर मध्ये दोन हजार रूपये टॅक्स घेतल्या जात आहे, तर मूल षहरात मात्र तो चार हजाराचे वर जात असल्यांची गंभीर बाब पुढे आली आहे. मूल नगर परिशद ही ‘क’ वर्ग नगर परिशद आहे, हे येथे उल्लेखनी आहे.
मूल नगर परिशदेनी ठरावाप्रमाणे षहराचे वाणिज्य, उच्च, मध्यम, निम्म रहीवासी, झोपडपट्टी असे वर्गीकरणाचे झोन पाडून, त्या-त्या झोनचे दराप्रमाणे कराची आकारणी करायची होती. प्रत्यक्षात नगर परिशदेने असे कोणतेही झोन न पाडताच कराची आकारणी करण्यात आली आहे. नगर परिशदेकडे झोनचे दस्ताऐवज मागणी केली असता, याबाबत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
नगर परिशदेनेच घेतलेल्या ठरावाप्रमाणे इमारतीचे पुर्वायुश्यानुसार, मालमत्ता कराची आकारणी करतांना पक्या घरासाठी 95 ते 30 टक्के पर्यंत, तर कच्या घरासाठी 95 ते 15 टक्के पर्यंत सुट द्यायची होती. अषी कोणतीही सुट मालमत्ता कराची आकारणी करतांना दिली नाही. यामुळे एखादे पक्के घराचे घरटॅक्स 5000 रूपये येत असल्यास, तो घर 40 वर्श जुना असल्यास नपच्या ठरावाप्रमाणे त्यांना 20 टक्के घरटॅक्स घ्यावयाचे होते म्हणजे केवळ 1000 रूपये आकारणी झाली असती. नगर परिशदेच्या अधिकाÚयांनी नगर परिशदेचा ठरावाला केराची टोपली दाखविल्यांने या घराला पूर्ण म्हणजे 5000 रूपये घरटॅक्सची आकारणी करण्यात आली आहे.
मूल नगर परिशद, षिक्षणाच्या कोणत्याही सुविधा देत नसतांना नागरीकांकडून तब्बल 6 टक्के षिक्षण कर सरसकट वसूल करीत असल्यांनेही मालमत्ता करात वाढ झाली आहे. हा टॅक्सही कमी करता आला असता, मात्र अधिकाÚयांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने याकडे कुणीही लक्ष दिले नाही.
पान क्रं. 4 वर नगर परिशदेने टॅक्स लावतांना कोणते निकश लावले याबाबत श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी, उपाध्यक्ष विजय सिध्दावार, मूल नगर विकास संघर्श समितीने अनिल मोगरे, संजय येरोजवार, निलेष रायकंटीवार, अविनाष गरपल्लीवार, कैलाष चलाख, संतोश पालांदूरकर, पटेल यांनी दिनांक 6 मार्च रोजी मुख्याधिकारी विजय सरनाईक यांची भेट घंेतली असता, त्यांनी कोणतेही समाधानकारक स्पश्टीकरण दिले नाही. येत्या आठ दिवसात 50 केसेसचा अभ्यास करून, टॅक्सची आकारणी कषी केली, घसारा कसा कमी केला हे चर्चेला बोलावून सांगण्याचे त्यांनी मान्य केले, मात्र अजूनही त्यांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही.
श्री. सरनाईक यांचेषी झालेल्या चर्चेत नपच्या कर्मचाÚयांनी गरीब-श्रीमंत, प्रतिश्ठीत-सामान्य असा भेदभाव करून, मालमत्ता कराची आकारणी केली असल्यांचे त्यांचे निदर्षनास आणून दिले. सर्व मालमत्ता धारकांचा तपषिल व त्यांना आकारण्यात आलेले कर यांचे विवरण 15 मार्च पर्यंत नगर परिशदेच्या वेब साईटवर सार्वजनिक करण्यांचेही त्यांनी कबूल केले, मात्र हे विवरण बातमी लिहीपर्यंत प्रसिध्द झाले नाही. नगर परिशद सार्वजनिक माहिती का लपवून ठेवत आहे, असा प्रष्न या निमीत्ताने निर्माण झाला आहे
मालमत्ता कराची आकारणी करतांना चुक झाल्यांचे एकीकडे मुख्याधिकारी अप्रत्यक्ष मान्य करीत असतांनाच, दुसरीकडे नगर परिशदेने गावात स्पिकर फिरवून, नगर परिशदेचे कर्मचारी घरोघरी जप्तीची धमकी दाखवून घरटॅक्स वसूलीचा तगादा लावीत असल्यांने, नागरीकांत रोश निर्माण होत आहे.
दरम्यान मूल नगर विकास संघर्श समितीने काही नागरीकांचे घरटॅक्स कमी करण्याबाबतचे दिलेले प्रस्ताव नगर विकास विभागाने मंजूर करून 20 टक्के पर्यंत टॅक्स कमी केले आहे. यावरून टॅक्स आकारणीत घोळ असल्यांचे अप्रत्यक्ष प्रषासनाने मान्य केल्याचे स्पश्ट होते.
त्या फाईल्स आल्याच नाही
नगर परिशदेची घरटॅक्स वाढीचे सुत्र समजावून घेण्यासाठी श्रमिक एल्गार आणि मूल नगर विकास संघर्श समितीचे पदाधिकाÚयांनी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांची भेट घेतली. यावेळी मुल्यांकन करतांना चुकिने मुल्यांकन करण्यात आले व यामुळे षेजारी-षेजारी असलेले समान बांधकाम असलेल्यांना मालमत्ता करात प्रचंड तफावत असल्यांचे निदर्षनास आणून दिले. पाच नागरीकांच्या मुल्यांकनाचे फाईल्स दाखविण्यांची मुख्याधिकारी यांचेकडे मागणी केली. फाईल्स दाखविण्यांचे श्री. सरनाईक यांनी मान्य केले, मात्र बैठक संपेपर्यंत या फाईल्स आल्याच नाहीत.
कुणाचे घरटॅक्स कमी आले असेल तर तुम्हीच सांगा.
नगर परिशद घरटॅक्स लावतांना गरीब-श्रीमंत, प्रतिश्ठीत-सामान्य असा भेद केल्यांचे मुख्याधिकारी यांचे निदर्षनास आणून दिले असता, त्यांनी कुणाचे टॅक्स कमी आहेत, त्यांचे नांवे सांगा, आम्ही फेरमुल्यांकन करून, घरटॅक्स वाढवू असा पवित्रा घेतला. नागरीकांनी गावातील लोकांची नांवे सांगून आपसात भांडणे लावण्यापेक्षा नगर परिशद मुल्यांकनाचे काम प्रामाणीकपणे का करीत नाही, यावर ते काहीही बोलले नाही.
मूल नगर परिशदेचे मालमत्ता करात प्रचंड वाढ झाली आहे. याचा फटका मूल वासीयांना बसत असून याबाबत अनेकांच्या तक्रारीही आलेल्या आहेत. आम्ही सत्तेत येण्याचे आधीच हि टॅक्स वाढ झाली होती. नागरीकांचे तक्रारीनंतर आम्ही जिल्हाधिकारी यांचेसोबत टॅक्स कमी करून नागरीकांना कसा दिलासा देता येईल याबाबत चर्चा केलेली आहे. यासाठी आवष्यक असलेल्या समितीचे गठण केले जाणार आहे. नगर परिशदेच्या एप्रिल महिण्यात होणाÚया बैठकीत मालमत्ता कर कमी करण्याबाबत आम्ही निर्णय घेणार आहोत.
सौ. रत्नमाला भोयर, नगराध्यक्षा
नगर परिशदेची करवाढ आम्हाला मान्य नाही. कोणत्याही स्थितीत आम्ही हा कर आम्ही कमी करू. जनतेच्या हितासाठी आम्ही नगर परिशदेत कार्य करीत असतांना जनहित विरोधी कर आम्ही मान्य करणार नाही.
ज्यांनी वाढीव दरांने टॅक्सचा भरणा केला आहे, अषांची अधिकची रक्कम आम्ही पुढील आर्थिक वर्शात जमा करू. कोणत्याही परिस्थितीत किमान 25 टक्के पर्यंत कर कमी करण्यांचा आम्ही निर्णय घेवू.
नंदू रणदिवे,
उपाध्यक्ष,

