तीन लाखांचा दारूसाठा जप्त

तीन लाखांचा दारूसाठा जप्त
चंद्रपूर : स्थानिक लालपेठ परिसरात शहर पोलिसांच्या डीबी पथकाने केलेल्या कारवाईमध्ये ३ लाख २0 हजार रूपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला.
सोबतच या तस्करीसाठी वापरात असलेले एक दुचाकी वाहनही जप्त करण्यात आले. लालपेठमध्ये एका वाहनातून दारुचा मोठा साठा पोहचल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारावर धाड घातली असता रस्त्याच्या कडेला ठेवलेली ३२ पेटी दारु आढळली. या प्रकरणात चंद्रशेखर मोलगुवार (२८), जुबेर खान (१८) यांना अटक केली.