शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी दारूबंदीची गरज
शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी दारूबंदीची गरज
निम्या मराठवाडयाच्या दारूबंदीस पाठिंबा, नाना पाटेकरांचा पाठिंबा
दारूबंदीसाठी विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आवाहन
खास प्रतिनीधी औरंगाबाद
दुष्काळामुळे मराठवाडयात गावोगावी नैराष्याचे वातावरण नापिकीमुळे दारूची सवय आत्महत्येस पोषकता निर्माण करूण देणारी, त्यावर आघात करता यावा यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटिल यांनी गावागावातुन किमान अवैध दारूची सहज उपलब्धता कमी व्हावी म्हणुन ग्रामसभांनी अवैध दारूच्या विरोधात ठराव करावेत. असे आवाहन केले आणि 3 हजार 263 गावांपैकी 1 हजार 742 गावांनी ‘आमच्या गावातुन अवैध दारूरोखा’, या आशयाचे ठराव दाखल केले आहेत अवैध दारूबरोबरच परवानाधारक दुकानातुन मिळणारीही दारूबंद करावी. अशी मागणी केली जात आहे. विषेश म्हणजे ‘नाम’ संस्थेचे प्रमुख नाना पाटेकर यांनीही या भुमीकेला पाठींबा दिला आहे.
मराठवाडयात या वर्शात 253 शेतक—यांनी आत्महत्या केल्या त्यातुन 93 शेतक—यांच्या आत्महत्या नापिकी आणि कर्जबाजारीमुळे असल्याचे पुढे आले आहे तर
100 प्रकरणांची चैकषी सुरू आहे. दररोज आत्महत्यांच्या आकडयांमध्ये वाढ होते आहे. पुढील दोन महीने नाजुक आहेत. अघटीत करण्याची मनात इच्छा होईल, असे वातावरण आहे. त्यात दारूची भर पडु देवू नये असे प्रयत्न सरकारने करायला हवेत, असे सुप्रसिध्द अभीनेते नाना पाटेकर यांनी लोकसत्ताषी बोलतांना व्यक्त केले. नैराष्येच्या गर्तेत सापडलेल्या शेतक—यांना किमान पाऊस पडेपर्यत तरी बाजुला ठेवता आले तर बरे होईल, असे सांगत नाना पाटेकर म्हणाले, ‘सरकारने आता मिळणा—या रेव्हेन्यूकडे जर दुर्लक्ष करायला हवे. अगदी कायमस्वरूपी नाही पण पाऊस पडेपर्यत मरावाडयात सरकारने दारूबंदीचा प्रयोग हाती घ्यायला हवा’.
दारूबंदी आणि अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीसांनीही पुढाकार घेतला आहे. ‘नुसते ठराव’ करूण भागनार नाही तर अवैध धंदे बंद करण्याचे कारवाही तातडीने करण्याच्या सुचना दिल्या आहेत. असे विषेश पोलीस महानिरीक्षक विष्वास नांगरे पाटील यांनी सांगीतले. पोलीसांनी अवैध दारूविक्रीवर आळा घालण्यासाठी पावले उचलली असली, तरी परवानाधारक दुकानातुन होणारी विक्री थांबवीणे आवष्यक बनली आहे. नापिकी कर्जबाजारीपना आणि पाणीटंचाई यास वैतागलेला मराठवाडयातील माणुस कोणत्याही क्षणी दारूच्या दुकानात जातो. एकदा नषा झाली, की त्याचे स्वतःवरचे नियंत्रण संपते. त्यामुळे आत्महत्यांच्या षक्यता वाढतात, असे डाॅक्टरांचेही मणणे आहे.
सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीने ग्रामीण भागात काम करणाÚया डाॅ. प्रतिभा फाटक म्हणाल्या, ‘15 ते 45 वयोगटातील तरूणांवर लक्ष केंद्रित करून किमान त्यांना तरी व्यसनापासून दूर ठेवता येईल काय, यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, संपूर्ण दारूबंदी झाली तर त्याचा एकूणच समाजजीवनावर चांगला परिणाम दिसून येईल. आत्महत्यांपूर्वी नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे निराष असणारा शेतकरी ब—याचदा व्यसनांचा आधार घेतो, हे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. त्यामुळे किमान पाऊस पडेपर्यत तरी दारूबंदीची आवष्यकता आहे. (दैनिक लोकसत्ता, दिनांक 2 एप्रिल 2016 वरून साभार)

