दारूबंदीची वर्शपूर्ती !

दारूबंदीची वर्शपूर्ती !
येत्या 1 एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्हा दारूबंदीला एक वर्श होत आहे. कधीच होणार नाही असा विष्वास चंद्रपूर जिल्हा दारूबंदीबाबत अनेकांना होता, मात्र 1 एप्रिल 2015 रोजी जिल्ह्यात दारूबंदीची ऐतिहासीक अमंलबजावणी सुरू झाली. या घटनेची वर्शपूर्ती येत्या काही दिवसातच होत आहे.
दारूबंदीनंतर अवैद्य दारू जिल्ह्यात चालू राहील यावर कुणाचेही दुमत नव्हते, मात्र लोकचळवळीतून झालेली दारूबंदीच्या अमंलबजावणीतही लोकसहभाग घेतला जाईल हा आषावाद मात्र धुळीस मिळविल्या गेला, त्यामुळे दारूबंदीची जेवढी परिणामकता साधता आली असती ती साध्य झाली नाही.
लोक सहभागातून दारूमुक्तीसाठी लोकांच्या विविध स्तरावर समित्यांचा प्रस्ताव सुरूवातीपासून देण्यात आला.  असा सहभाग देण्यास लोकही उत्सूक होते. अधिकारासह अषा समित्या अस्तित्वात आल्या असत्या तर, जिल्ह्यात दारू आली असती तरी ती विकता आली नसती, मात्र हा प्रस्ताव मंत्रालयात आजही धूळ खात आहे.  ज्या समित्या जिल्हाधिकारी यांनी आपल्या अधिकारात केल्या आहेत, त्यांना कोणताही अधिकार नाही, त्यामुळे या समित्यांचा प्रभाव दारूमुक्तीसाठी होईल यावर विष्वास नाही.
अवैद्य दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी कायदयात बदल करण्यांचीही मागणी होती, सरकारने ती मान्यही केली, प्रत्यक्षात कायदे मात्र बदलले नाही.  विषेशतः अवैद्य दारू विक्रेत्यांना तातडीने जमानत न देणे, दारू तस्करीचे वाहन सरकार जमा करणे यासारखे कायदे बदलले असते तर, अवैद्य दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळणे षक्य झाले असते.
जिल्ह्यात दारूबंदीची अमंलबजावणी केवळ पोलिस यंत्रणेवर सोपविण्यात आली आहे.  पारदर्षीकतेचा अभाव आणि लोकसहभागाचे वावडे असलेल्या या विभागाने बÚयापैकी दारू पकडली, मात्र दारू केवळ आम्हीच पकडू, आम्हाला वाटेल त्यांचीच पकडू ही भूमीका ठेवल्यांने, जे दारू पकडून देण्यास सहकार्य करीत आहेत, त्यांचेवरच खोटया तक्रारी आहेत, हे माहित असतांनाही गुन्हे दाखल करून, ‘तुमची या कार्यात आम्हाला गरज नाही’ असेच सांगण्याचा प्रयत्न या वर्शभरात करण्यात आला.
अवैद्य दारू येत असली तरी या दारूबंदीचे सकारात्मक दृश्य परिणामही या काळात दिसून आले.  विषेशतः राज्यात सगळीकडे वाढत जाणारा गुन्हेगारीचा आलेख चंद्रपूर जिल्ह्यात कमी झाला.  खून-अपघात कमी झाले, गणेषोत्सव, धुडवळ, षिमगा यासारखे दंगली घडविणारे सण अतिषय षांततेत पार पडले.  लग्न वेळेत आणि षांततेत होवू लागले.  विषेशतः चंद्रपूर जिल्हा दारूबंदीचे आंदोलन महिलांच्या हिंसेमुळे आक्रमक झाले होते, दारूबंदीच्या वर्शभरात दारू पिवून महिलांना मारहाण होण्यांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर कमी झाल्यात.  चंद्रपूर जिल्हा दारूबंदीच्या आंदोलनाचा प्रभाव म्हणून, राज्यातील यवतमाळ, अहमदनगर, पुणे, सातारा, बुलढाणा, अकोलासह अनेक भागात महिलांनी दारूबंदीसाठी चळवळ उभारली.  दारूबंदीच्या वर्शभरात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही चंद्रपूर जिल्हयातील दारूबंदीच्या बाजूने आपले निर्णय दिले हे विषेश !