संपादकीय
ग्रामनाथासाठी स्वामीनाथन?
देशात आपला विदर्भ शेतक-यांच्या आत्महत्येसाठी कुप्रसिध्द झालाय. मागील अनेक वर्शापासून शेतक-यांच्या आत्महत्येचे चक्र काही केल्या कमी होत नाही. मुख्यमंत्री पॅकेज, प्रधानमंत्री पॅकेज, 70 हजार करोड रूपयाची कर्जमाफी यासारख्या उपाययोजना या आत्महत्या थांबवू शकल्या नाहीत. या सा-या योजना राबविण्यांत सरकारी यंत्रणाच दोशी आहे, सरकारच दोशी आहेत, या आत्महत्या नव्हे तर हत्या आहेत हत्या असे निवडणूकीत प्रचार करीत सत्तेत आलेल्या भाजपा सरकारच्या काळातही आत्महत्येचा "स्कोर' काही कमी झाल्यांचे दिसत नाही.

वंदनीय राश्टसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगिताच ग्रामनाथाला अर्थात शेतक-याला अर्पण केली. महाराज म्हणतात,
सर्व ग्रामासी सुखी करावे । अन्न-वस्त्र-पात्रादि द्यावे ।
परि स्वतः दुखचि भोगावे । भूशण तुझे ग्रामनाथा ।।
महाराजांनाही बळीराजाच्या दुखाची कल्पना होती, महाराजाच्या काळात दुखी असलेला बळीराज आजही सुखी झाला नाही याचे शल्य आहे. जगाचा पोशिंदा सुखी झाला नाही, याही पेक्षा चिड आणणारी बाब म्हणजे शेतकरी सोडून सर्व सुखी झाले, अगदी त्याच शेतात काम करणारा मजूर देखिल शेतक-यांपेक्षा बरे दिन अनुभवत आहे. शेतक-यांच्या त्यागाविशयी महाराज म्हणतात,
कश्ट करोनी महाल बांधसी।परि झोपडीही नाही नेटकिशी
स्वातंर्त्याकरीता उडी घेशी। मजा भोगती इतरचि ।।
केंद्र शासनाने भारतीय कृशी अनुसंधान संस्थेचे माजी संचालक आणि आंतरराश्टिय किर्तीचे कृशी शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथ्न यांचे अध्यक्शतेखाली 18 नोव्हेंबर 2004 रोजी राश्टिय कृशक आयोगाची स्थापना केली. आयोगाने डिसेंबर 2004, ऑगश्ट 2005, डिसेंबर 2005 आणि एप्रिल 2006 मध्ये चार अहवाल सादर केले. 4 ऑक्टोबर 2006 रोजी पाचवा आणि शेवटचा अहवाल सादर केला. वाढत्या आत्महत्या आणि शेतक-यांची दयनीय परिस्थिती पहाता केंद्र सरकार या आयोगाचा अहवाल गांभीर्याने घेतील अशी सा-यांनाच आशा होती, मात्र सरकारची उदासिनता येथेही दिसून आली. जागतीक दर्जाच्या शास्त्रज्ञाच्या अहवालाचे नशिबी केराची टोपलीच आली.
केंद्र सरकारने याच काळात दिलेला 6 वा वेतन आयोग लागू केला, आता 7 वा वेतन आयोगही गठीत झाला, तोही सरकार लागू करेल, मग स्वातंत्रोत्तर काळात शेतक-यांच्या परिस्थितीवर नेमलेल्या एकमेव स्वामीनाथ्न आयोगाच्या अमंलबजावणीच्या दिशेने पाऊल टाकणार आहे काय? कि महाराजांनी म्हटल्याप्रमाणे - "मजा भोगती इतरचि' हेच सत्य ठरणार आहे?