भाजप शिक्षक आघाडीच्या पूर्व विदर्भ नागपूर विभाग संयोजकपदी प्रदीप बिबटे यांची नियुक्ती!

राष्ट्रीय व राज्य पुरस्कृत आदर्श शिक्षक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव; शैक्षणिक व संघटनात्मक कार्याला मिळणार नवी दिशा

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी  : - भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीच्या पूर्व विदर्भ नागपूर विभाग संयोजकपदी आदरणीय प्रदीप बिबटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे शिक्षक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, राष्ट्रीय व राज्य पुरस्कृत आदर्श शिक्षक असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शिक्षकांच्या समस्या, शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्न आणि शिक्षकांच्या न्याय्य मागण्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी संघटनात्मक नेतृत्वाची महत्त्वपूर्ण भूमिका असते. या पार्श्वभूमीवर प्रदीप बिबटे यांची पूर्व विदर्भ नागपूर विभाग संयोजकपदी झालेली नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

शिक्षकांना संघटित करणे, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, शैक्षणिक क्षेत्रातील अडचणींचा पाठपुरावा करणे तसेच शिक्षक आणि संघटनात्मक कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधून संघटनेचे कार्य अधिक मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येणार आहे. त्यांच्या अनुभवातून आणि नेतृत्वातून पूर्व विदर्भातील शिक्षक आघाडीचे कार्य अधिक व्यापक, गतिमान व प्रभावी होईल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या नियुक्तीबद्दल राष्ट्रीय व राज्य पुरस्कृत आदर्श शिक्षक असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस बळीराम चापले, राज्य कोषाध्यक्ष सुनील नायक, राज्य कार्याध्यक्ष जगन्नाथ पोटे, विभागीय अध्यक्ष ओमप्रकाश गायधने, राज्य उपाध्यक्ष गजानन कुरवाडे, राज्य उपाध्यक्ष डॉ. शारदा रोशनखेडे, राज्य सहसचिव डॉ. चित्रा मजूमदार व विजया कोकमवार, राज्य कार्यकारिणी सदस्या रंजना सोरमारे, तसेच ओमप्रकाश मस्के, पक्षभान ढोक, शेषराव घाटोळे, प्रशांत जंजाळ, अशोक गिरी, खुशाल डोंगरवार, डॉ. युवराज खोब्रागडे आणि डॉ. निलेशकुमार इंगोले यांच्यासह संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

प्रदीप बिबटे यांच्या नियुक्तीमुळे शिक्षक आघाडीच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळून शिक्षकांच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याची संधी निर्माण होणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्व विदर्भातील शिक्षक संघटनात्मक चळवळीला नवी ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

या नियुक्तीबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रदीप बिबटे यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक वाटचालीसाठी यश, समृद्धी आणि उत्तम कार्याची कामना केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!