धानाच्या गंजीला आग लागल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान

 धानाच्या गंजीला आग लागल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान 

सावली - चारगाव येथील सनथकुमार बोरकर यांच्या शेतात ठेवलेल्या धान पुंजन्याला आग लागून हजारो रुपयाचे नुकसान झाले आहे.

      चारगाव येथील शेतकरी सनथकुमार बोरकर यांनी आपल्या गट नं. १०४ या शेतात धान पीक घेतले. धान काढून आपल्या शेतात पुंजने रचले. काही दिवसात मशीन लावून चूरणे करायची वेळ आली असतांना बुधवारी सायंकाळच्या सुमारास अचानक पुंजन्याला आग लागली. उपस्थितानी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात आली नाही. एका एकरचे धान जळाल्याने शेतकऱ्याचे फार नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी ही मागणी करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!