वरोरा शहराजवळ पेट्रोल-डिझेलच्या टँकरला भीषण आग;
ढाब्यासह चारचाकी व दुचाकी वाहने जळून खाक!
भारत पेट्रोलियमच्या इंधनाने भरलेल्या टँकरला आग लागल्याने आगीने जवळच्या पेट्रोल पंप व गॅस स्टेशनला धोका,
सुदैवाने जीवितहानी नाही
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - नागपूर-चंद्रपूर महामार्गावर वरोरा शहराजवळील मालू पेट्रोल पंपासमोर गुरुवारी (२० नोव्हेंबर) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास पेट्रोल आणि डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरला अचानक भीषण आग लागली. टँकरमधे भरलेल्या इंधनाने पेट घेतल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले होते. आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि धुराचे लोट लांबूनच दिसत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
एमएच 34 बी.झेड. 4019 क्रमांकाचा हा टँकर नागपूर येथील बोरखेडी डेपोतून चंद्रपूरच्या दिशेने जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. टँकरमध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही असल्याचे यामधे असल्याचे सांगण्यात येत आहे. टँकरला आग लागल्यानंतर इंधन रस्त्यावर पसरल्याने आगीची तीव्रता आणखी वाढली होती. या आगीत रस्त्यालगत असलेल्या दत्तू झाडे यांच्या ढाब्याचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून, तेथील चारचाकी आणि दुचाकी वाहने जळून खाक झाली आहेत.
या घटनेमुळे आणखी मोठ्या प्रमाणात नुकास होऊ शकले असते कारण अपघातस्थळाच्या एका बाजूला भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप व सी. एन.जी. गॅस स्टेशन, तर दुसऱ्या बाजूला रेल्वे मार्ग आहे. टँकरमधील पेट्रोल-डिझेलच्या आगी ही जर पेट्रोल पंपापर्यंत पोहोचली अस्ती तर कदाचित मोठी दुर्घटना घडली असती. मात्र अग्निशमन दल आणि पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टाळता आला. या घटनेत टँकर चालक सुखरूप असल्याची माहिती मिळाली असून या मद्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान आगीमुळे नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी सुद्धा चंद्रपूरकडे जाणारी वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली. त्यानंतर जळालेला टँकर रस्त्याच्या बाजूला करण्यात आले.
दरम्यान, टँकरला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. भारत पेट्रोलियम कंपनीच्या इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरची मध्यरात्रीच्या वेळी होणारी वाहतूक नियमांनुसार आहे का? याची संबंधित विभागाने तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. तसेच आगीत ढाब्याचे आणि वाहनांचे नुकसान झाल्याने भारत पेट्रोलियम कंपनीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ढाबामालक दत्तू झाडे यांनी सुद्धा केली आहे.
दरम्यान या घटनेमुळे इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा ऐरणीवर आला असून
या घटनेमुळे इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरची सुरक्षितता, तांत्रिक तपासणी आणि वाहतुकीच्या नियमांच्या पालनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी या घटनेची सखोल चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करणे गरजेचे आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!