नवभारत कन्या विद्यालय, मूल येथे शिक्षक श्रेणी प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नवभारत कन्या विद्यालय, मूल येथे शिक्षक श्रेणी प्रशिक्षण उत्साहात
मूल : शिक्षण विभागामार्फत नवभारत कन्या विद्यालय, मूल येथे सुरू असलेल्या निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी शिक्षक प्रशिक्षणाला जिल्ह्यातील शिक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २ जूनपासून सुरू झालेल्या या प्रशिक्षणात मूल, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीड, सावली, चिमूर, भद्रावती व बल्लारपूर तालुक्यातील एकूण १०५ शिक्षक सहभागी झाले आहेत. हे प्रशिक्षण १२ जून पर्यंत दहा दिवस सुरू राहणार आहे.
प्रशिक्षण कालावधीत ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार असून, शेवटी कृती संशोधन प्रकल्प सादर केल्यावरच प्रशिक्षण पूर्ण समजले जाणार आहे. हे प्रशिक्षण पगारातील श्रेणीवाढ सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण विभागाने अनिवार्य केले आहे.
या प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध विभागांतील तज्ञ मार्गदर्शक शिक्षक योगदान देत आहेत.
यात निवड श्रेणी (प्राथमिक), लक्ष्मण खोब्रागडे, श्रीमती प्रज्ञा सोनटक्के, धर्मपाल बोदलकर, युवराज ठाकरे
निवड श्रेणी (माध्यमिक) : विजय घोंगे, प्रशांत कंडे, सुहास पुपलवार
वरिष्ठ श्रेणी (माध्यमिक) : माया झरकर, बबीता चहांदे, विक्रांत रामटेके
संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम तालुका समन्वयक श्रीरंग कुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. त्यांच्या सहकार्याला आनंद गोगले, केदार सोनुले व कैलास कोसरे हे सहायक म्हणून पाठबळ देत आहेत.
प्रशिक्षणाची शिस्तबद्धता, गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन आणि सहभागी शिक्षकांची सक्रियता यामुळे हे प्रशिक्षण निश्चितच एक आदर्श उपक्रम ठरत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!