अवैधरित्या रेतीची तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाची धडक कारवाई
ट्रॅक्टर चिमूर तहसीलला जप्त
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - जिल्ह्यात कोणतेही रेतिघाट लिलाव झाले नसतांना रेती चोरी करून सऱ्हास वाहतूक केली जात आहे.महसूल विभागाच्या धडाडी पथकाने चिमूर तालुक्यातील नेरी - सावरगाव मार्गावर चिमूर येथील बबलू जाधव यांच्या मालकीचा अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून जप्तीची कारवाई करीत तहसील कार्यालयात जमा करून धडक कारवाई केली. सदर कारवाई हि महसूल विभागाने रात्रीच्या वेळी गस्तीवर असतांना केली. सध्या रेती मागणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रेती तस्कर जोमात असून महसूल विभाग कोमात आहेत अशी नागरिकांमध्ये चर्चा असतांना महसूल विभागाने मागील दोन दिवसात चार ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई केली आहे. चिमूर तालुक्यात रेती तस्करीला सुगीचे दिवस आले आहेत मात्र मागील अनेक दिवसांपासून रेतीची चोरी अनेक घाटावर जोमात सुरू होती यात हजारो ब्रास रेतीचा उपसा होऊन करोडो रुपयांचा शासनाचा महसूल बुडाला असल्याचे नागरिक बोलीत आहेत अशीच कारवाई अगोदर केली असती तर शासनाचा महसूल बुडाला नसता परंतु महसूल विभागाला उशिरा जाग आल्याची चर्चा परिसरात आणि तस्करात रंगताना दिसत आहे.मात्र या जप्तीच्या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दनाणले आहे चिमूर येथील बबलू जाधव यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्र. एम.एच. ३४ सी.डी.९३६८ या क्रमांकाचे ट्रॅक्टर नेरी परिसरातील उमा नदी घाटावरून रेती भरून जोमाने नेरी सावरगाव मार्गाने रात्रौ ११:०० वाजता दरम्यान जात असतांना महसूल विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचून ट्रॅक्टर पकडला सदर ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई करून ट्रॅक्टर चिमूर तहसील कार्यालयात दाखल करीत हि कारवाई देविदास निकुरे नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी चिडे आणि महसूल अधिकाऱ्यांच्या चमूने केली.या कारवाईचे सर्वच स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!