चिमूर नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पाला लागली आग
नगर परिषदेचे नियोजन शून्य कारभार
शहर - प्रतिनिधी ( चंदू मडकवार )
चिमूर : - चिमूर पासून अगदी जवळच ४ कि.मी.अंतरावर असलेल्या नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पाला अचानक आग लागल्याची घटना दिनांक.०७/०४/०२०२५ रोजी दुपारच्या सुमारास ०३:०० वाजता च्या सुमारास घडली हि आग मोठी भयावह असल्यामुळे आणि नगर परिषदेचे नियोजन शून्य कारभार असल्यामुळे हि आग लागल्याची चर्चा जनतेमध्ये पसरली आहे. नगर परिषदेचे कर्मचारी त्याठिकाणी उपस्थित असतांना सुद्धा हि घटना घडली तरी कशी? आणि नगर परिषदेकडे फायर ची सुविधा असतांना देखील तासन - तास उलटून सुद्धा आगीवर ताबा मिळवू का शकले नाही? सायंकाळी ०७:०० वाजेपर्यंत आग विझविणे सुरूच होते.यामध्ये कसल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून लाखोंचा नुकसान झाला आहे.उशीरा रात्रीपर्यंत आगिवर नियंत्रण मिळविण्यासाठी नगर परिषदेचे कार्य सुरूच होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!