आग व संरक्षण आणि मानव वन्यजीव संघर्ष कार्यशाळेचे मेंडकी येथे आयोजन"

आग व संरक्षण आणि मानव वन्यजीव संघर्ष कार्यशाळेचे मेंडकी येथे आयोजन"
ब्रम्हपुरी:
       ब्रम्हपुरी वनविभागा अंतर्गत वनपरिक्षेत्र उत्तर व दक्षिण ब्रम्हपुरी येथील उपक्षेत्र मेंडकी येथे दिनांक 28.02.2025 ला मा. उपवनसंरक्षक वनविभाग ब्रम्हपुरी, आणि मा. सहाय्यक वनसंरक्षक (प्रादे व वन्यजीव आणि तेंदु) वनविभाग ब्रम्हपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली 'आग व संरक्षण तथा मानव वन्यजीव संघर्षाबाबत' कार्यशाळा आयोजित करण्यांत आलेली होती. 
      या कार्यशाळेत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. एस.बी. नरड, प्रमुख पाहुणे श्री. आर.डी. शेंडे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. यश कायरकर स्वाब नेचर संस्था तळोधी तथा श्री. ललीत उरकुडे अर्थ कन्झरर्वेशन सोसायटी ब्रम्हपुरी आणि श्री. विशाल सालकर व.प.अ. सिंदेवाही तसेच राकेश आहुजा बॉयोलाजीस्ट ब्रम्हपुरी  वनविभाग हे होते.  श्री. नलेश देवाजी भोयर पोलीस पाटील गांगलवाडी अध्यक्ष पोलीस पाटील संघटना तसेच श्री. सुरेश लहुजी ठिकरे उपसरपंच भुज आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते.
      उन्हाळयाला सुरवात झालेली असल्यामुळे आणि मोहफुल गोळा करण्यासाठी जंगलक्षेत्रात गेल्यावर गावकऱ्यांनी जंगलामध्ये वनवणवा किंवा आग लावू नये त्याचप्रमाणे प्रत्येकाने निर्संग सृष्टीचे संरक्षण केले पाहीजे. तर जंगलामध्ये गस्तीदरम्यान एखादया व्यक्तीजवळ आग लागणारी कोणतीही वस्तु आढळून आल्यास व जंगलात आग लागल्यास वनकर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीवर भारतीय वनअधिनियम 1927 च्या नुसार कारवाई करावी तसेच वनविभागा अंतर्गत मिळणाऱ्या योजना बावत सविस्तर माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. विशाल सालकर सिदेवाही यांनी समजावून सांगीतले.  त्याचप्रमाणे श्री. यश कायरकर यांनी नागरीकांना जंगलामध्ये मोहफुल गोळा करतांना सतर्क राहुन मोहफुले गोळा करावीत परंतु जंगलामध्ये कोणत्याही प्रकारची आग लावू नये कारण जंगलात लागलेली आग ही आपल्या घराला सुद्धा जाळते जंगलात लागलेला वनवा पाल्या पाचोळ्या सोबतच सरपटणाऱ्या प्राण्यांपासून तर इतर जीवसृष्टीचा सुद्धा विनाश करते, तसचे जंगलातील लागलेली आग विझविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करुन सांगीतले. तसेच श्री. ललीत उरकुडे अर्थ कंन्झरर्वेशन सोसायटी ब्रम्हपुरी यांनी वने ही आमच्या आजोबा पंजोबांनी आमच्यासाठी राखून ठेवलेली आहेत आणि त्याचे आपण सर्वानी जतन केले पाहीजे असे सांगीतले. श्री. राकेश आहुजा बॉयोलाजीस्ट यांनी मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनामध्ये 50-55 वर्षावरील वयोवृध्द इसमांनाच जास्तीत जास्त जंगलातील वन्यप्राण्यापासूनच धोका निर्माण होऊन एखादेवेळी आपला जिव गमवावा लागतो त्यामुळे वृध्द व्यक्तींना जंगलात जाऊ न देणे हि कुटूंबातील व्यक्तीची जबाबदारी असल्याचे सांगितले, त्याचप्रमाणे वनवणवा हंगामात जंगलात आगी दिल्यास वनविभागाला सहकार्य, मदत करण्याचे अध्यक्षीय भाषणातून वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तर ब्रम्हपुरी यांनी आवाहन केले.
            कार्यक्रमाला उत्तर व दक्षिण ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील सर्व वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सरपंच, पोलीस पाटील ,स्वाब संस्थेचे जिवेश सयाम, नितीन भेंडाळे, तसेच सिएफआरचे अध्यक्ष आणि सदस्यगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संचालन श्री एम.एच. सेमस्कर वनपाल मुख्यालय ब्रम्हपुरी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी श्री. पि.जे. शेंदुरकर मेंडकी, श्री. एस.डब्लू. शेंडे वनरक्षक मंडकी, श्री. एस.डी. बळदे वनरक्षक ब्रम्हपुरी,तसेच सर्व वनकर्मचारी, वनमजूर यांनी विशेष परिक्षम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!