विदर्भ युवा क्रांती संटना तर्फे पवनी बचाओ आंदोलन

तुम्हाला माहिती आहे का नगर परिषदेच्या भ्रष्टाचारी भस्मासुर..?

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - शेकडो करोड रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या नगरपरिषदेच्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्या विरोधात विदर्भ युवा क्रांती संटना पवनी तर्फे निषैध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तुम्हाला माहिती आहे का नगर परिषदेच्या भ्रष्टाचारी भस्मासुर..? पवनी शहराच्या विकास कामांसाठी आलेल्या निधीतूनू १०० करोडाहून अधिकचा घोटाळा झालाय. या भ्रचारी राक्षस अधिकाऱ्याने शेकडो करोड साठी कितीतरी नाल्या, कितीतरी रस्ते, ई लायब्री मधील AC, तर कितीतरी ई लायब्रऱ्यांच सरसकट गिळंकृत केल्या. " शाळेवरील सिमैंट काँक्रिटचे छत उधळून दोन - दोन करोडच्या टीनांचे मांडव टाकले.ज्या पाण्यात जहरी साप, मासोल्या जगू शकत नाही आणि नंतर मरून सळून गळून दूषित झालेले पाणी आपल्याला पिण्याकरिता नळाद्वारे देतो.भरतीची तयारी करणाऱ्या, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ,खेळांमध्ये भविष्य पाहणाऱ्या आपल्या मुला बाळांच्या मूलभूत सुविधा चोरून स्वतःपुरता वापरतो हा भ्रहाचारी राक्षस महिन्यातून मोजके दोन ते चार दिवस येणारा हा भ्रचारी भस्मासुर जनतेच्या समस्या दूर करण्याकरिता नाही तर फक्त पवनीला लुटायला आणि कमिशन न्यायला येतो.पवनी शहरातील अनेक छोट्या मोठ्या समस्या मोठ्या होऊ पाहत आहेत आणि हा राक्षस फक्त ठेकेदाराना खाखेत दाबून पैसा मोजतो.घरकुल संबंधी वारंवार जनतेशी खोटे बोलून जनतेच्या खिशातल्या पैशाची उधळण करणारा हा भ्रहाचारी राक्षस जनतेची नेहमी फसवणूक करतो.पवनी वासीयांनो, जरा विचार करा आपल्या घरून कोणी एखादी छोटीशी वस्तू जरी चोरून नेली तर आपण त्याला मारायला धावतो.मग तुमच्या, माझ्या, आपल्या सर्व पवणी वासीयांच्या विकासासाठी आलेला आपल्या हक्काचा पैसा नगर परिबदेचा भ्रष्चारी राक्षस खुलेआम भरदिवसा तुमच्या माझ्या उघळ्या डोळ्या देखत शेकडो करोडोंची चोरी करतोय आणि आपण गप्प का? आपला नौकर आपल्याला डोळे दाखवून जोर मारतोय तरी आपण चूप का? हा झालेला आणि सुरू असलेला भ्रस्टाचार थांबावा तुम्हाला वाटतो का? जरा विचार करा १०० करोडहून अधिक तर फक्त या नगरपरिषदेच्या भ्रष्टाचारी भस्मासुराने खाल्ले जर १०० करोडचे उद्योग धंदे पवनी शहरात लागले असते तर अख्ख्या पवनी तालुक्यातील बेरोजगारीचा प्रश्न मिटला असता स्थानिक व्यापाऱ्यांना धंद्यात चालना मिळाली असती असं आम्हाला वाटते १०० करोड मध्ये आणखी काय काय होऊ शकले असते ते तुम्हाला काय वाटते हे
आपण हर्षल वाघमारे फेसबुक अकाउंट वरील पोस्टवर मत मांडू शकता.पवनी वासीय बंधू आणि भगिनींनी आपल्याला जर हा भ्रस्टाचार थांबवा आणि भ्रस्टाचारी भस्मासुर अधिकाऱ्याचा नायनाट व्हावा असं वाटत असेल तर दिनांक.०३/ ०३/ २०२५ ला ठीक सकाळी ११:०० वाजता फक्त पवनी ला वाचविण्याकरिता छ्त्रपती शिवाजी महाराज चौकातून निघणान्या निषेध मोर्चात मो्या संख्येने सहभागी व्हा. आणि मी निषेध मोर्चात सहभागी होणार असे स्टेटस ठेवा. आपल्या संपर्कातील प्रत्येकाला निषेध मोर्चात सहभागी होण्याकरिता प्रोत्साहित करा ""अभी नही तो, कभी नही"' अशाप्रकारे विदर्भ युवा क्रांती संटना तर्फे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून कितपत जनता या मोर्चाला सहभागी होतील याकडे पवनी शहरात चर्चेला उधाण आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!