गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीस अटक
चिमूर पोलिसांची धडक कारवाई
२१४५० रुपयांचा गांजा जप्त
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर पोलिसांनी गोपनीय माहीतीच्या आधारे सापळा रचून दिनांक. १५/०३/२०२५ रोजी रात्री ०९:३० ते ११:३० वा. दरम्यान आरोपी ईसम नामे मोहम्मद वहद अब्दुल रहिम शेख, वय-४५ वर्षे, रा. गोविंद नगर मोमिनपुरा, नागपुर , हल्ली मु. पिली नदी जोगी अरविंद नगर नाल्या जवळ नागपुर यांची शासकिय पंच व मापारी, फोटोग्राफर यांचे समक्ष मौजा-चिमुर नविन बस स्थानक, ०२ कि.मी.पुर्वेस झडती धेतली असता, त्यांचे ताब्यातुन २ किलो ४६ ग्रॅम गांजा कि. २०,००० रुपये तसेच गांजा ठेवण्यासाठी कथ्या रंगाची बंग २०० रुपये खिशामध्ये नगदी २५० रुपये आढळून आले. व एक ACE कंपणीचा आकाशी निळया रंगाचा मोबाईल किंमत १००० रुपये असा एकुण २१४५०/- रुपयांचा माल मिळुन आला, अशा सरतर्फे तक्रारदार यांचे तक्रारीवरुन गुन्हा नोंद करुन अप क्र. १११/२०२५. क- ८ (क). २० (ब) (ii) (A) गुंगिकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS ACT) नुसार कारवाई करून प्रकरण तपासात धेतला आहे.आरोपीस अटक करुन, हवालात बंद केले.हि कारवाई पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात निशांत फुलेकर सपोनि, मल्हारी ताळीकोटे सपोनि, विलास राधोबाजी निमगडे, पोहवा/ २१८८, पो.स्टे. चिमुर, यांनी केली असून पुढील तपास सुरु आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!