गो.वा. कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा शिबिरात सापाबद्दल जनजागृती

गो.वा. कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा शिबिरात सापाबद्दल जनजागृती
"सापांचे जहर हे मंत्राने नाही ते फक्त सापांच्या विषापासून बनलेल्या विष प्रतिरोधकथामुळेच उतरू शकते, कोणत्याही नागमोती/ मांत्रिकाच्या नादी लागून आपले जीव गमावू नका." -यश कायरकर.
नागभीड:
    नागभीड येथील गोविंदराव वारजूरकर कॉलेज तर्फे राष्ट्रीय सेवा शिबिर हे तालुक्यातील हुमा (मांगरूळ) या गावात घेण्यात आला. या शिबिरामध्ये परिसरात जनजागृती चे कार्य करणाऱ्या स्वाब नेचर केअर संस्थेच्या वतीने   'साप, अंधश्रद्धा, व विज्ञान' या विषयावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गावातील जनतेमधील सापां बद्दलच्या असलेल्या अंधश्रद्धा, सापाबद्दलचा लोकांमध्ये असलेला अज्ञान व भीती दूर करण्याचे उद्देशाने शिबिरामध्ये सापाबद्दलच्या जनजागृती कार्यक्रमाची आवश्यकता  हे स्वाब संस्थेचे शैक्षणिक विभाग प्रमुख नितीन भेंडाळे यांनी सुरुवातीला पटवून दिले.
       प्रमुख मार्गदर्शक यश कायरकर यांनी सापांच्या विविध प्रजाती त्यांची ओळख परिसरात आढळणाऱ्या विविध विषारी, बिनविषारी व निमविषारी साप, सर्पदंशाचे कारण आणि सर्पदंश टाळण्याकरता घ्यावयाची काळजी, सापांच्या अंधश्रद्धा व कायदा या  विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी देशातील सर्पदंशामुळे होणारे मृत्यू  व त्या मागचे कारण आणि अंधश्रद्धा  याबाबतही सविस्तर माहिती देत. "जिल्ह्यात नेमकेच विषारी साप असून त्यासारखेच दिसणारे बिनविषारी साप सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे घाबरून न जाता,सर्पदंश झाल्यावर तात्काळ रुग्णालयात उपचार करा, सापाचे जहर हे मंत्राने नाही ते फक्त सापांच्या विषापासून बनलेल्या विष प्रतिरोधकथामुळेच उतरू शकते, कोणत्याही नागमोती/ मांत्रिकाच्या नादी लागून आपले जीव गमावू नका." हे मार्गदर्शनात सांगितले.
    यानंतर गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देत सर्पमित्र व संस्थेचे बचाव दल प्रमुख जीवेश सयाम,यांनी शंकेची निराकरण केले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी सर्पमित्र जीवन गुरूनुले, छत्रपती रामटेके, अमीर करकाळे, गिरीधर निकुरे, शुभम निकेश्वर, गावचे सरपंच छगन कोलते सरपंच कॉलेजचे शिक्षक देवढगले सर ,हनवते सर, कापगते सर , मिश्रा मॅडम, सातपैसे मॅडम हे यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!