वरोरा तालुक्यात अवैध धंद्याना उत.. तालुक्यातील अनेक गावात खुलेआम चालणाऱ्या अवैध धंद्याना आशीर्वाद कोणाचा?

वरोरा तालुक्यात अवैध धंद्याना उत.. 
तालुक्यातील अनेक गावात खुलेआम चालणाऱ्या अवैध धंद्याना आशीर्वाद कोणाचा? 

वरोरा....जगदीश पेंदाम

तालुक्यातील अनेक गावामध्ये  सध्या अवैध धंद्याना उत आला आहे. अवैध धंद्याना  जणू तालुक्यात परवानेच मिळालेले आहे. राजरोजपणे चालणाऱ्या या अवैध धंद्यावर प्रशासन एवढ मेहरबान का? असा प्रश्न मात्र सर्व सामान्यांना पडलेला आहे. तालुक्यात सध्या खुलेआम रेती तस्करी, दारू विक्री, सट्टा पट्टी, तर काही ठिकाणी गांजा विक्री सुद्धा राजरोसपाने सुरु आहे. पान टपरी च्या व हॉटेल च्या नावाखाली काही ठिकाणी दारू, सट्टा, व गांजा विक्री सुरु असून  प्रशासन मात्र कुंभकरण झोपेत आहे. राजरोस पणे मांजर बनून दूध पिणाऱ्या या अवैध मांजरांना भीती मात्र कुणाचीस उरलेली नाही असेच चित्र सध्या तालुक्यातील काही ठिकाणी बगायला मिळत आहे. 

तसेच तालुक्यात सुरु असलेल्या अवैध उत्तखन्नात शासनाचा मात्र लाखो रुपयाचा महसूल बुळत असुन वन अधिकारी व राजस्व विभाग व पोलीस प्रशासन मात्र शांतीची झोप घेताना दिसून येत आहे. ऐवढच काय तर सध्या छोट्या छोट्या वाहणावर कारवाई चा बडगा उभारणारे परिवहन विभागचे अधिकारी मोठं मोठ्या वाहणाकडे मात्र पूर्ण पणे डोळेझाक करताना दिसून येत आहे. सध्या वरोरा चिमूर महामार्ग क्र. ३५३ ई वर रोज काही १४ ते १६ चाकी मोठी वाहने फक्त समोरील एकच नंबर प्लेट लावून मागे तसेच बाजूला नंबर प्लेट लपवून राजरोस पणे गाड्या चालवत असून यावर परिवहन विभागाचे अधिकारी मात्र कारवाही करताना दिसून येत नाही. त्यामुळे थोड्यासाठी मोठा दंड आकारणारे हे अधिकारी मात्र या अवैध धंदे करणाऱ्या व नियम धाब्यावर बसवणाऱ्यावर मात्र मेहरबान दिसून येत आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!