भिसी च्या रेती माफियांचा मांगलगाव-मेटेपार नदीवर दरोडा
दोन महीण्या पासुन नदी वर मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू
तलाठी व महसुल विभागाचे दुर्लक्ष
तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)
चिमुर : - चिमूर तालूक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध रेती व मुरमाचे उत्खनन सुरू असुन याकडे महसुल विभाग जानिव पुर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यात मांगलगाव-मेटेपार नदी वर भिसी येथिल रेती माफिया मागील दोन महीण्या पासुन दरोडा घालीत आहे.सतत मागील दोन महिण्या पासुन रेती उत्खनन सुरू असुन हजारो ब्रास रेतीचे उत्खनन केले आहे.याच रेती माफियानी पुयारदंड जंगल परीसरातील नदी-नाल्यात मोठ्या प्रमाणात उत्खनन करून पुर्ण नदी पात्र सपाट केले आहे .या नदी मधून रात्र भर रेतीचे ३ ते ४ ट्रॅक्टर द्वारे रेती काढली जात आहे.व इथे चाय-पाणी याची पुर्ण पने सोय करण्यात आली आहे.रेती माफीयाची चार चाकी वाहान( लाल) कलर मांगलगाव बस स्टॉन जवळ रात्रोला देख-रेख साठी उभी असते.ट्रॅक्टर हे कधी जांभुळघाट मार्गे जातात तर कधी मांगलगाव मार्गे भिसीला जात असतात.अवैध उत्खनन मागे तलाठी व महसुल विभागाचाच मोठा आर्शिवाद असल्याची चर्चा जनते मध्ये होत आहे.या उत्खननाने शेतकऱ्यामध्ये नाराजिचे वातावरण निर्माण झाले आहे.शेतामध्ये हंगामी पिक शेतकरी घेत असल्याने शेता मधून ट्रॅक्टर जात असतात याकडे महसुल विभागाने लक्ष देऊन तात्काल मोठी कार्यवाही करण्यात यावी.असी मागनी शेतकरी व जनते कडून होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!