डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा..!!!

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा..!!!

  नागभीड: 
               सरस्वती ज्ञान मंदिर , नागभीड येथे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ पानसे यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे सहायक शिक्षक आशिष गोंडाने सर, सहा. शिक्षिका किरण वाडीकर मॅडम, आशा राजूरकर मॅडम,स.शि. पराग भानारकर सर ,सतीश जीवतोडे सर, सहा. शिक्षिका पूजा वीर मॅडम,भावना राऊत मॅडम, श्रद्धा वाढई मॅडम यांची उपस्थिती होती.
          याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक पानसे सर यांनी सर्वप्रथम भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यानंतर सहायक शिक्षिका आशा राजूरकर मॅडम यांनी भीम गीतातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. प्रमुख अतिथी आशिष गोंडाने सर, किरण वाडीकर मॅडम,कार्यक्रमाचे अध्यक्ष पानसे सर, आशा राजुरकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. 
           यावेळी विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आपल्या विचारातून प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग सातवीची विद्यार्थिनी कु. लक्ष्मी डहारे हिने केले तर आभार कु. नूतन नारनवरे हिने मानले. या कार्यक्रमास कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते...!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!