गिरगाव येथील सरपंच गिताबाई बोरकर यांची सरपंच सेवा जिल्हाध्यक्षपदी निवड.

गिरगाव येथील सरपंच गिताबाई बोरकर यांची सरपंच सेवा   जिल्हाध्यक्षपदी निवड.

 तळोधी .- 
नागभीड तालुक्यातील गिरगाव येथील सरपंच तथा  भाजपच्या कर्तव्यदक्ष कार्यकर्त्या गीताबाई अशोक बोरकर यांची सरपंच सेवा संघ या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली .
नागभीड तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या गिरगाव येथील  सरपंच पदावर कार्यरत  असलेल्या गीताबाई अशोक बोरकर ह्या मागील  10. वर्षापासून ग्रामपंचायत मध्ये सतत निवडून येत असून भाजपच्या कर्तव्य दक्ष सामाजिक कार्यकर्त्या  म्हणून तालुक्यात नाव आहे तसेच त्या सतत भाजपच्या कार्यक्रमासह इतर सामाजिक कार्यक्रमातही अग्रेसर राहून कार्य करीत असतात त्यामुळे त्यांची निवड सरपंच सेवा संघाचे माजी अध्यक्ष व उश्राळमेंढा  येथील माजी सरपंच हेमंत लांजेवार यांच्या मार्गदर्शनात  सरपंच सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे यांनी त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे  . यावेळी बाजार समितीचे संचालक हेमंत लांजावार ,अमोल ठेरकर , सौ कल्याणी अंबाडाहारे  हे उपस्थित होते तर 
त्यामुळे त्यांचे भाजपचे नागभीड तालुका अध्यक्ष, संतोष रडके,  नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अवेश पठाण, उपसभापती रमेश पाटील बोरकर , शिवशंकर सहारे सावरगाव, गणेशभाऊ तरवेकर , संजय गजपुरे भाजपचे जेष्ठ नेते,होमदेव मेश्राम माजी सरपंच वलनी, रमेश बोरकर गिरगाव ,राजू  घिये , उपसरपंच तलोधी यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!