आर्य वैश्य समाज मंदिर मूल, माता वासवि इतिहास आणि वर्तमान - एक आढावा

आर्य वैश्य समाज मंदिर इतिहास आणि वर्तमान - एक आढावा

  • डॉ. राजश्री सुकेश मुस्तीलवार



माता वासवि इतिहास



वासवि माता .... आर्य वैश्य  समाजातील १०२ गोत्रांची स्वामिनी..जिच्या नावातच दयाळूपणा समतोलपणा, कुशलपणा, मुसद्दीपणा  आणि सौंदर्यता व्यक्तिमत्त्वातील पैलूंचा संचयाचा खजिनाच जणू..आर्य वैश्य समाजाचे  प्रतिनिधित्व  करणारि वासवी मातेचा समाज सुसंस्कृत, धनाढ्य आणि  उच्च विद्या विभूषित  आहे हे  त्रिवार सत्य.... आंध्र प्रदेशातील गोदावरी नदीच्या तिरी  वसलेल्या  थनकुसा तालुक्यातील पेनुगुंडा हे  वासवी मातेचे जन्मस्थान..  आपल्या निस्वार्थ भावनेतून स्वताचे आयुष्य.  समाजाच्या उन्नतीसाठी समर्पित  केले...ह्याच पवित्र ठिकाणी  वासवी मातेची तब्बल ९० फुटाची  पंच धातूची भव्य मूर्ती स्थापना करण्यात आली आहे.....कन्यका मातेचा पूर्वेतिहास  बघता राजा कुसुमश्रेष्ठी  व राणी  कुसुंबा च्या पोटी   पुत्र कामेष्टी यज्ञाचा प्रसाद म्हणून वैशाख शुक्ल  शुक्रवार  उत्तर  नक्षत्रावर कन्या राशी मध्ये वासवी आणि विरुपाक्ष  ह्यांचा जन्म झाला..वाढत्या वयाबरोबर वासवी मातेचे सौंदर्या ही खुलत होते..ह्याच सौंदर्यावर भाळून विष्णुवर्धनाने वासविमातेला  लग्नाची मागणी  घातली..त्यासाठी राजा कुसुमश्रेष्ठीने वंशाचे ७१४ गोत्रजांना आमंत्रित केले आणि विष्णुवर्धनाच्या आलेल्या लग्नाच्या प्रस्तावाबाबत  सभेला अवगत करण्यातआले....मात्र ७१४ पैकी १०२ गोत्रजच आत्मसमर्पणाच्या बाजूने तयार झाले.. मात्र त्या क्षणी ६१२ गोत्रज वैश्य कुळातून कायमचेच बाहेर पडले...चालुक्यराजाला विष्णुवर्धनाने नकार कळवताच पेनुगुंडावर आक्रमणाची तयारी केली..मात्र वासवी मातेला आपल्यामुळे  रक्तपात व्हावा हे  कदापि  मान्य नव्हते..अहिंसा आणि त्यागाच्या भूमिकेतून युद्ध नियंत्रणाचा संकल्प केला. योजनेनुसार नागेश्वर  मंदिरा जवळ १०३ अग्नि कुंडाचीव्यवस्था करण्यात आली.. आहुतीसाठी १०२ गोत्रज्यांना विचारणा करण्यात आली... तत प्रसंगी वासवी मातेने आपले विश्वरूपदर्शन  देताच   मातेची  महती सर्वांच्या लक्षात आली..युद्ध थांबवून रक्तपात संहार टाळला गेला...ह्या उदात्त हेतूने  स्त्री  जातीचा  संरक्षण करण्याचा संकल्प  करून वासवी ब्रम्हचारीनी नावाने परिचित झाली .. वासवी मातेच्या नवनिर्मित मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा पणाच्या निमित्याने मंदिरा  संबंधित मंदिराचा पूर्व ईतिहास समाज बांधवाना अवगत करण्याचा हा छोटासा प्रयत्न... 

मूलचे आर्य वैश्य समाज महादेव मंदिर एक आढावा

समाजातील जाणकार   समाज  बांधवानी  दिलेल्या माहितीनुसार आपले पुनरुत्थान पूर्वीचे आर्य वैश्य  मंदिर १०० वर्षांपूर्वीचे असावे याची नोंद धर्मादाय आयुक्त कडे करण्यात आली आहे.. जवळपास पंचायतन हनुमान मूर्ती व भवानी मंदिर अशा प्रकारचे ते मंदिर होते... कालांतराने १९८० च्या दशकात  नवीन मंदिर बांधण्याकरिता श्री काशिराव फडणवीस यांच्याकडून  मंदिरासाठी  जागा घेण्यात आली. .. अर्थात ती जागा त्या जागेचे मालक श्री काशीराव फडणवीसच होते आणि त्यांच्यात जागेत भवानी मंदिर असण्याची माहिती मिळते. ...मात्र अपुऱ्या जागेमुळे श्री बाबूजी गंगुवार यांच्याकडून मंदिराच्या लगतची किमान ८०० फूट जागा  विकत घेण्यात आली आणि मग काय बघायचं त्या जागेवर मंदिर निर्मानाचे काम सुरू करण्यात आले..स्वर्गीय बापूरावजी चिंतावार, स्वर्गीय विश्वेश्वर गोगिरवार ,स्वर्गीय मनोहर चिंतावार स्वर्गीय मधुकर चिंतावार ,स्वर्गीय रघुनाथ चिंतावार, स्वर्गीय मनोहर गोगुलवार आणि स्व जनार्दन गंधेवार यांच्या अथक परिश्रमाने नवनिर्माण जागेवर मंदिर बांधकामाचे काम  बघता-घता सुरू पण करण्यात आले.. आपल्या समाज बांधवांनी त्यात आपआपल्या परीने प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला ..परंतु पैश्या अभावी बाहेर गावातील समाजबांधवा  कडून वर्गणी  जमा करण्यात आली आणि अशा पद्धतीने ते जुने मंदिर बांधण्यात आले..उत्तम व्यवस्थापने करिता सर्वानुमते ठराव घेऊन लग्नकार्यासाठी सर्व समाज बांधवांसाठी सदर मंदिर उपलब्ध करून देण्याचा ठराव  सर्वानुमते मंजूर करण्यात आला... त्याकरिता लागणारी पाकशाळा, व्यवस्थापकासाठी लागणारी  खोली, स्वच्छतागृह यासाठी जागा मात्र अपुरी पडू लागली आणि मग  सर्वानुमते विचार विनिमयानुसार श्री बाबुरावजी चिंतावार यांनी मंदिराच्या बाजूची १४०० फूट  जागा स्वेच्छेने गुप्त स्वरूपात मंदिरास दान केली आणि त्या जागेवर मंदिर बांधण्यात आले .. या जुन्या आर्य वैश्य मंदिरातील माता कन्यका परमेश्वरीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.. कन्यका मातेची मूर्ती  तळोधीचे.  दानशूर समाजबांधव श्री नानासाहेब पोशेट्टीवार यांनी आपल्या स्वेच्छेने दान केली.. पूर्वीच्या महादेव मंदिरात शंकर पार्वतीची मूर्ती, दत्तमूर्ती,साईबाबांची मूर्ती  गजानन महाराज, भवानी माता आणि मारुतीची मूर्ती  आदी देवतांची मूर्ती स्थापीत करण्यात आली ..हा जवळपास १९८३ ते १९८४ च्या दरम्यानचा काळ असावा आणि सदर आर्य वैश्य महादेव मंदिरात दरवर्षी उत्साहाने प्रत्येक सण, प्रत्येक उत्सव समाज बांधवांच्या उपस्थितीत साजरे होऊ लागले.. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे भव्य दिव्य प्रमाणात साजरा होणारा कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव.. सोबतच मंदिर वर्धापनाच्या दिवशी करण्यात येणारी कुमकुम पूजा!!! 

सुधीरभाऊ आणि सपनाताईचे पुढाकार आणि मंदिराचे जिर्णोध्दार

२०१४ मध्ये आदरणीय सुधीर भाऊ आणि सौ सपनाताई नी ज्यावेळी मंदिरास भेट दिली त्या क्षणी या दानशूर दांपत्याने भव्य दिव्य मंदिर साकारण्याची संकल्पना मूल समाज बांधवांसमोर व्यक्त केली आणि त्यांच्या योगदानातून त्यांच्या संकल्पनेतून ,त्यांच्या इच्छेतून ,त्यांच्या समाज कर्तव्यातून आज भव्य दिव्य  असे नेत्र दीपक मंदिर पूर्णत्वास आले आहे.  माननीय श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ सपनाताई सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कल्पनेतून आपल्या नवीन आर्यवैश्य समाजाचे भव्य दिव्य मंदिर साकार करण्यात आले.. मंडळींनो  जुन्या मंदिराचा संपूर्णतः कायापालट करण्यात आला आहे.. प्रथम दर्शनी जेव्हा मंदिरावर कटाक्ष टाकतो तेव्हा त्याची भव्यता प्रत्येकाच्या नजरेत भरते .. मंदिराची बाह्यरचना मंदिराच्या भव्यतेची साक्ष देते..मंदिराचा  कळस तेथील.        धर्मक्षेत्राची   अनुभूती देतो..जणू काही परमात्म्याच्या. प्रभामंडलाची  सक्रिय उपस्थिती.    ती  साक्षच देत असावी... वासवी मातेच्या.       मंदिरात प्रवेश करताना भक्तांच्या डाव्या बाजूने १००  वर्ष  प्राचीन   दीपस्तंभ  ,त्यावरील कलश , मांगल्याचे प्रतीक स्वस्तिक अगदी.          दिमाखात विराजमान होऊन जणू   सर्व प्राणिमात्रांच्या  सुखावह जीवनाची   हमी देतो आहे... प्रत्येकाला एकच प्रश्न  पडतो ईतके भव्य दिव्य  मंदिर उभारण्यासाठी किती कल्पकता असावी!!!!   लागलीच सपना ताईंचा चेहरा सामोरी   प्रतिबिंबित होतो...  देवाने दिलेल्या अनमोल कलेने   वास्तूविशारद  ही धन्य  पावले. असणारच....पाहता क्षणी मुख्य  दारावरील सुबक, सुरेख कलाकारी  केंद्रस्थानी असणारे  पावित्र्याची साक्ष देणारे कमलपुष्प    नजरेत भरल्याशिवाय कसे राहणार......भाविकांच्या डाव्या बाजूला असणारे कोणत्याही शुभ कार्याचा आरंभ.          ज्यांच्या आशीर्वादाने केल्या जातो असे शंकर पार्वती  पुत्र  श्री  गणेशजी  बुध्दीवंताचे प्रतिनिधित्व करतात ते विराजमान आहेत...   उजव्या बाजूस केसरी नंदन हनुमानाची कृपा सर्वांवरच राहणार.....मंदिरात प्रवेश करताच सुंदर सुरेख पवित्र आणि मंगलमय वासवी कन्यका मातेचे नेत्रकमलास दर्शन होताच नेत्र   सुखाने नेत्रकमलाला तृप्तता मिळते .प्रथम दर्शनी अतिशय रेखीव अशी ही सर्वांच्या लाडक्या कन्यका मातेची मूर्ती बघताच साक्षात कन्यका माता सामोरी बसली असा अनुभव नक्कीच प्रत्येकजण  अनुभवतो... गर्भगृहातील वासवी मातेने  दिलेला शुभ लाभ  प्रत्येकावर असणार्‍या आशीर्वादाची कृपा दर्शविते....वासवी मातेच्या  दर्शनाने प्रत्येक जण परम सुखाची अनुभुती अनुभवतो...पावित्र्याची प्रचिती मागे असणार्‍या  कमलपुष्प देतोच....विशेष   बाब गर्भगृहाच्या  अगदी खाली   असणारे  प्रार्थनास्थळ म्हणजे  परमात्म्याशि होणारा   सुखद संवादाची सुवर्ण  संधीच जणू.... आकाश वायू पृथ्वी अग्नी जल यांचे स्वामी असणारे शिव पंचायत .... सुख शांती प्रदान करणारे आणि नकारात्मकता दूर करणारे नवग्रहांची मूर्ती तयार आहेत ... देवतांचे देवता श्री शंकर जी त्यावर होणारा जलाभिषेक मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करणारे देवाधिपती श्री शंकरांच्या मूर्तीचे पूजन करून हवे तेवढे पूजा पदरात पाडून घेण्यासाठी शंकरजींचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहणारच सबका मालिक एक श्रद्धा और सबुरी याची शिकवण देणार सर्वांचे लाडके दैवत साईबाबा आणि गण गण गणात बोते म्हणजे प्रत्येकाने हृदय असतं परमेश्वर बघायला शिका अशी शिकवण देणारे गजानन महाराज आपल्या आशीर्वादासाठी आहेतच ... सर्व मुर्त्या तेवढ्याच लक्षणीय आहे ... मंदिरामध्ये झालेले सर्वत्र कोरीव आणि तेवढेच रेखीव का मनाचा ताजे तवांना कायम ठेवते... सोबतच तळघरात असणार होम हवन वातावरण शुद्धीकरण करून मनातील परमात्म्याची भावना उत्कट करण्यास सहाय्यभूत ठरते धार्मिक कार्याची पूर्ती करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले हे भवन समासातील स्त्री वर्गासाठी मिळालेली एक पर्वणीच जणू.... सोबतच बाजूला असणारा हॉल समाज बांधवांसाठी आणि इतर बांधवांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याची भव्यता बघताक्षणीस निदर्शनास येते आणि याच हॉलच्या माध्यमातून मंदिराच्या व्यवस्थापनासाठी आर्थिक तरतुदीची सोयपण काही प्रमाणात करण्यात आली आहे...  मंदिराच्या दैनंदिन नित्य पूजेसाठी गुरूंची निवासाची करण्यात आली आहे.. अतिशय नेत्र दीपक सोहळा श्री सुधीर भाऊ आणि सौ सपना ताई त्यांच्या मार्गदर्शक आणि कृपेने दिनांक १४, १५  आणि १६ या तीनही दिवशी धार्मिक विधी १६ तारखेला कन्या का मातेची प्राणप्रतिष्ठा या नवनिर्माण मंदिर करण्यात येणार आहे अतिशय भव्य  मंदिर समाज बांधवांसाठी बांधून दिल्याबद्दल समस्त समाज बांधवा तर्फे आम्ही  श्री सुधीरभाऊ आणि सौ सपना ताईंचे आभार मानतो आणि आम्ही सर्व समाज बांधव आपले सदैव ऋणी राहू आणि या क्षणी सर्व समाज बांधवाप्रती आम्ही संकल्प करतो आपल्या संकल्पनेतून आपल्या योगदानातून आणि आपल्याच कृपेने हे सुंदर श्री कन्यका माता परमेश्वरी मंदिर बांधून दिले त्याची व्यवस्थित व्यवस्थापन करून..पुरेपूर काळजी घेऊ याची हमी देतो पुनश्च एकदा सर्व समाज बांधवा तर्फे आम्ही आपले ऋणी आहोत



 लेखिका - डॉ सौ राजश्री सुकेश मुस्तीलवार

 आभार सौ हिराताई दत्तात्रय चिंतावार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!