तहसीलदार कौटकर यांना शिवसेना ( उबाठा )यांनी दिले निवेदन...
येवती साजातील तलाठीच्या निष्काळजीपणा मुळे ,गारपीट ग्रस्त शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित
शेतकर्यांना मदत जाहीर करून निष्क्रिय तलाठी यांच्यावर कारवाई करावी..अभिजित कुडे विधानसभा प्रमुख, युवासेना
वरोरा...जगदीश पेंदाम
वरोरा तालुक्यातील येवती साजातील तलाठीच्या निष्काळजीपणा मुळे ,गारपीट ग्रस्त शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित असुन मागच्या वर्षी रब्बी हंगामातील चणा, गहु पिकावर गारपीट होऊन शेतकर्यांची अतोनात नुकसान झाले होते. तालुक्यातील ईतर भागातील पंचनामे होऊन शेतकर्यांना मदत मिळाली पण निवेदन देऊन देखील निव्वळ तलाठी यांच्या आडमुठेपणा पंचनामे केले नाही त्यामुळे तालुक्यातील उखर्डा, येवती, केळी, वाघनख गावातील शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहिला आहे.निवेदन देऊन देखील वारंवार तक्रारी करूनही तलाठी यांच्या हलगर्जीपणा मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.प्रशासनाने दखल घेऊन शेतकर्यांना न्याय द्यावा अन्यथा शेतकरी आक्रमक भूमिका घेणार तसेचअश्या निष्क्रिय तलाठीला जाब विचारला पाहिजेत सतत शेतकर्यांच्या आडमुठेपणा करत त्यांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे. अनेक तक्रारी करून देखील प्रशासन याकडे कानाडोळा करीत आहेत नुकसान होऊन देखील त्यांना पंचनामे करण्यास अडचण काय, निवेदन देऊन देखील पंचनामे करण्यात का आले नाही, शेतकऱ्यांचे फारमोठे नुकसान झाले आहे याला जबाबदार कोण? तात्काळ शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी व तलाठी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवेदन देत तहसीलदार योगेश कौटकर यांना केली आहे..
यावेळी उपस्थित वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर,विधानसभा प्रमुख युवासेना अभिजित कुडे, ओंकेश्वर टोंगे, सरपंच वैभव महल्ले, पवन पिजदुरकर संजय चिंचोलकर शंकर उघडे गजानन चिंचोलकर अशोक पिसे राजू पिसे भालशंकर ,नरेश ठाकरे , वैभव पुसदेकर, रोशन भोयर, नरेश डोमकावळे, विकास तामगाडगे, नगाजी पाचभाई ,तेजस उरकुडे, योगेश फुलफेले व असंख्य शेतकरी उपस्थित होते...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!