अपघातग्रस्त युवकाच्या मदतीसाठी गणेश मंडळाचा पुढाकार - अनावश्यक खर्च टाळत दिंडी भजनात विसर्जन

 



सावली - गणपती विसर्जन म्हटले की डीजे, बँड पथकाच्या तालावर नाचणे. पण या माहोलचा खर्च टाळून केवळ भजन दिंडी ने मिरवणूक काढत अनावश्यक खर्च कमी करून आपल्याच मंडळातील सदस्याच्या उपचाराकरिता आर्थिक मदत करून सामाजिक दायित्वाचा संदेश खेडी येथील जय मल्हार गणेश मंडळाने दिला आहे. 

        सावली तालुक्यातील खेडी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेश बाप्पाची स्थापना करण्याचा निर्णय मल्हारराजे गणेश मंडळाने घेतला. त्यासाठी गणेश मूर्ती, मंडप, डेकोरेशन, डीजे व इतर कामाची बुकिंग करण्यात आली. डेकोरेशन व मूर्तीचे काम पूर्ण झाले. त्यातच मंडळाचे सदस्य विनोद बिराजी नेरडवार यांचा गणेश आगमनापूर्वी 5 सप्टेंबर ला खेडीजवळ अपघात झाला. अपघातामुळे दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे मंडळाच्या सदस्यांना धक्का बसला. त्यांनी अनावश्यक खर्च कमी करण्याचा निर्णय घेऊन डेकोरेशन व डीजे रद्द केले. चंद्रपूर येथे जाऊन सदस्यांनी आपल्या सहकाऱ्याला रक्त दिले. डीजे, ढोलताशे यांच्या आवाजात थिरकनारे युवकांनी सामाजिक भान ठेवत गणपतीचे विसर्जन भजन दिंडीने काढत बाप्पाला भक्तीभावाने निरोप दिला. अनावश्यक खर्च कमी करून नागपूर येथे उपचाराकरीता 53 हजार रुपयाची आर्थिक मदत दिली. या गणेश मंडळातील युवकांच्या उपक्रमाचे कौतुक केल्या जात आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!