जल जिवन मिशन योजनेच्या अलगर्जी कामामुळे शेतकऱ्यांना त्रास
नवरगाव : रत्नापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मौजा सरांडी येथे सन 31/1/2023पासून सुरु असलेल्या हर घर जल या योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली, या कामाची निविदा रक्कम 49.51लक्ष एवढी असून या कामाचे कंत्राटदार अजिंक्य मानकर हे असून यांनी मनमानी काम केल्याचे दिसून येत आहे, पुरवठा विहीर ही नदीच्या पात्रात तयार केली असून तिच्या स्वभोवती दगड गिट्टी ने बुजाई न करता तेथीलच मातीने बुजाई करण्यात आली, पंप गृहाचे काम सदर पांधन रस्त्यावर उभारण्यात आले, नदीकडून पाईप लाईन टाकण्याकरिता पांधन रस्त्याने खोदकाम केले व शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी जाण्याकरिता रोड ला टाकलेले टाकलेले सिमेंट पाईफ फोडून टाकीची पाईप लाईन टाकून जेसीबीने बुजाई करण्यात आली त्यामुळे शेतातील पाणी निघणे अवघड झाले आहे, या गोष्टी कंत्राटदार मानकर यांना सांगितले असता त्यांना तुमाला जे करायचे आहे ते करा, कुणाकडे कम्प्लेंट करायची आहे ते करा या शब्दात बोलून निघून गेले, आता दोन दिवसाचे पाणी शेताच्या बाहेर निघत नसल्याने शेतकऱ्यांनी जायचे कुणाकडे करिता या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन फोडलेले पाईप टाकून देण्यात यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!