काय रस्ता...काय खड्डे.. काय पाणी..एकदम ओके..माढेळी-नागरी जि.प.भागातील रस्त्यांची तात्काळ बांधकाम विभागाने लक्ष द्यावे अन्यथा बांधकाम विभागाला कुलूप लावून आंदोलन करण्यात येईल..अभिजित कुडे विधानसभा प्रमुख युवासेना

काय रस्ता...काय खड्डे.. काय पाणी..एकदम ओके..माढेळी-नागरी जि.प.भागातील रस्त्यांची
तात्काळ बांधकाम विभागाने लक्ष द्यावे अन्यथा बांधकाम विभागाला कुलूप लावून आंदोलन करण्यात येईल..अभिजित कुडे विधानसभा प्रमुख युवासेना 

वरोरा...जगदीश पेंदाम 

तालुक्यातील माढेळी-नागरी भागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे परंतु याकडे बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे परिसरात रस्ता हा प्रश्न निर्माण झाला आहे संपूर्ण रस्ते खड्डेमय झाली आहे काय रस्ता.. काय ते खड्डे.. एकदम ओके, या रस्त्यांच्या ठिकाणी मोठमोठे गड्डे पडले असून रस्त्यावर अक्षरशः तलावाच्या स्वरूप निर्माण झाले आहे प्रसाक्षणाला अनेक निवेदन दिले आंदोलन केले तरी देखील बांधकाम विभाग कुंभकरण  झोपेत आहे,परिसरात दोन,तीन रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून बाकी रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.पावसाळा सुरू झाला आहे ,अनेक पुलाला भगदाड पडले आहेत खोल खड्डे पडले आहेत या रस्त्यामुळे बससेवा प्रभावित झाल्याने विद्यार्थ्यांंना नाहक त्रास सहन करावा लागत आहे यासाठी अभिजित कुडे यांनी अनेक आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले पण अजून प्रशासनाला जाग आली नाही रस्त्यावरून साचलेल्या पाण्याच्या वाहन धारकाला अंदाज न आल्यामुळे रात्रीच्या वेळी किरकोळ अपघात घडत आहेत जनता हतबल झाली आहे यासाठी अनेक आंदोलन निवेदन दिले भजन आंदोलन, झाडे लावा आंदोलन,  झोपा काढा आंदोलन, भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, खड्ड्यात स्विमिंग केली,सतत पाठपुरावा केला त्यानंतर उखर्डा, महाडोळी, धानोरा रस्त्याचे काम सुरू झाले पण बाकी रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे.  उखर्डा ते उखर्डा पाटी,  हीवरा, केळी,  येवती , बोरी, आमडी,  नीलमई,  वाघनख, महाडोळी ते  चीकणी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे लोकाना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे.  तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती करावी अन्यथा बांधकाम विभागाला कुलूप लावून आंदोलन करणार असा इशारा विधानसभा प्रमुख युवासेना अभिजित कुडे यांनी दिला आहे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!