मुरमाडीच्या ग्रामसेवकाचा कमिशनचा फंडा नवा - मर्जीतील व्यक्तीला बोगस मजूर दाखवून हडपली रक्कम @ रोजगार सेवकालाच बनवले बांधकाम मजूर
मुरमाडीच्या ग्रामसेवकाचा कमिशनचा फंडा नवा - मर्जीतील व्यक्तीला बोगस मजूर दाखवून हडपली रक्कम
@ रोजगार सेवकालाच बनवले बांधकाम मजूर
मुल - गावातील शासकीय कामे करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ग्रामपंचायतच्या माध्यमातून बांधकामे केली जातात. याचाच गैरफायदा घेत मुरमाडी येथील ग्रामसेवक श्री. उत्तम धारणे हे आपल्या मर्जीतील व्यक्ती जे कधीच कामावर नव्हते व ग्रामपंचायतचे रोजगार सेवक आहेत त्यांना मजूर दाखवत कामाच्या १० टक्के रक्कम त्यांचे बँक खात्यात वळती करून टक्केवारीचा नवीन फंडा शोधून काढत रक्कम फस्त केल्याचा प्रकार समोर आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, मुल पंचायत समिती अंतर्गत मुरमाडी गट ग्रामपंचायतितील मानकापूर गावात पंचायत समिती १५ वा वित्त आयोगांतर्गत शाळेच्या सौचालयाचे काम एका ठेकेदारामार्फत करण्यात आले. झालेल्या कामाच्या मजुरीची रक्कम मजुरांच्या बँक खात्यात अदा करावी लागते. पूर्वी मजुरांची रक्कम रोख देता येत असल्याने त्यात आपले कमिशन काढता येत होती. मात्र यावरही उपाय शोधत १० टक्के रक्कम आपल्या मर्जीतील रिकेश कपाटे या चक्क रोजगार सेवकाच्या बँक खात्यात जमा केली. ही बाब ठेकेदाराच्या लक्षात आल्याने कमिशनची रक्कम भरपूर असून काही रक्कम परत करण्याची विनंती केली पण टक्केवारीची सवय लागलेल्या श्री. उत्तम धारणे या ग्रामसेवकाने ती रक्कम हडप केली. या प्रकरणातील संभाषणाचा ऑडिओ क्लिप व बोगस मजुराची यादी पब्लिक पंचनामा प्रतिनिधीच्या हाती लागली आहे. याबाबत पंचायत समिती मुल काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!