शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तंबाखू नियंत्रण कार्यशाळा संपन्न



चंद्रपूर ( प्रतिनिधी) - 
    शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सहकार्याने एक दिवसीय राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.  
  सिपेट वर्कशॉपमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ.श्वेता सावलीकर, समुपदेशक मित्रजंय निरंजणे, सामाजिक कार्यकर्ते तुषार रायपूरे मार्गदर्शक म्हणून लाभले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रासेयो चे कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर होते. गटनिदेशक एन.एन.गेडकर  यांची उपस्थिती होती. 
प्रास्ताविक तुषार रायपूरे यांनी केले तर समुपदेशक निरंजने यांनी तंबाखू गुटखा सेवन करणाऱ्या व्यक्तीला होणाऱ्या आजारपणावर प्रकाश टाकला. विद्यार्थी वर्गांनी चुकीच्या संगतीने तंबाखू गुटखा सारख्या व्यसनाधीन होऊन स्वतः बरबाद होऊ नये. तंबाखू पासून दूर राहण्याचा निर्धार करावा आणि आपले आरोग्य जपावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 
    प्रस्तुत कार्यक्रम संस्थेचे प्राचार्य आर. बी. वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. सूत्रसंचालन रासेयो स्वयंसेवक अर्पिता घाघरगुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन निदेशक उज्वल कोठारकर यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी निदेशक नाडमवार, घटे, गराड, केने, वरभे तसेच स्वयंसेवक कु. सरोज साहू, आदित्य विश्वकर्मा, प्रज्वल हजारे आदींनी  परिश्रम घेतले. दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाच्या निमित्ताने दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून संस्थेतील कर्मचारी व प्रशिक्षणार्थांना  दहशतवाद व हिंसाचार विरोधी सामुहिक शपथ देण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!