अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये मादा रानगवा ठार.



यश कायरकर,:
ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या नागभीड वनपरिक्षेत्रातील हुमा बिटातील मौजा चिंधी माल नजदीक नागभीड - चंद्रपूर हायवेवर पहाटे साडेचार ते पाच वाजताच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत  अंदाजे ५ वर्ष वयाची मादा रानगवा ठार झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
   घटनेची माहिती मिळताच एस. बी. हजारे सहाय्यक वनसंरक्षक ब्रह्मपुरी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी नागभीड सोबत नागभीड वनपरिक्षेत्रात चे कर्मचारी व स्वाब नेचर केअर संस्थेचे सदस्य घटनास्थळी उपस्थित झाले. नंतर मोक्का पंचनामा करून जंगलामध्ये नेऊन शव विच्छेदन करण्यात आले. हे शव विच्छेदन नागभीडच्या पशु चिकित्सक डॉ. कुमारी ममता वानखेडे यांनी केले. 
    यावेळी एक.के. नेरलावार क्षेत्र सहाय्यक नागभीड, एस. एस. कुळमेथे वनरक्षक हुमा बीट, आर. सिडाम वनरक्षक मांगरुड, विवेक करंबेकर मानद वन्यजीव संरक्षक ब्रह्मपुरी, पवन नागरे अध्यक्ष झेप संस्था नगभीड, यश कायरकर अध्यक्ष स्वाब संस्था, जिवेश सयाम, नितीन भेंडाळे, आमीर करकाडे, शुभम निकेशर हे स्वाब संस्थेचे सदस्य, तथा वन मजूर उपस्थित होते. अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल करून पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी तथा सहाय्यक व संरक्षक एस. बी. हजारे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.
      विशेष म्हणजे हा रस्ता वन्यजीवांच्या अपघातात मृत्यूसाठी कुप्रसिध्द असून सतत या रस्त्यावर वन्यजीवांचे अपघात होतच असतात. यातच पंधरवड्यापूर्वी म्हणजे 15 जानेवारीला एका अज्ञात वाहनाच्या धडकत दोन नर चितळांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. प्रत्येक महिन्याला या परिसरामध्ये वन्यजीव अपघात हे ठरलेलेच असून या परिसरात घोडाझरी अभयारण्य मधून ब्रम्हपुरी, गायमुख कडे जाण्या येण्याचा कारिडोर याच परिसरातून आहे. आणि रोडच्या दोन्ही बाजूला शेत शिवारांमध्ये शेतपीक लावल्या असल्यामुळे हे कडधान्य खाण्याकरता रात्री हे वन्यजीव रस्त्यावरून इकडून तिकडे ये-जा करतात. व अपघातात मृत्युमुखी पडतात. त्यामुळे अपघात होऊ नये म्हणून वन विभागाने या परिसरामध्ये तसे सूचना फलक लावलेले आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करून वाहन चालक भरधाव वेगाने वाहने चालवतात व  वन्यजीव मृत्यूमुखी पडल्याच्या घटना ह्या सतत घडत असतात. काही वर्षांपूर्वी याच परिसरामधून तुकूम- घोडाझरी - ते चिंधीचक या मार्गावर उड्डाणपूल निर्माण करण्याचा प्रस्ताव असून त्याचा भूमिपूजन सुद्धा नेत्यांच्या हाताने करण्यात आला. मात्र अजून त्याची कुठलीही सुरुवात झाली नाही. तर वन विभागाने व रस्ते बांधकाम विभागाने या कडे गांभीरतेने बघून तात्काळ उड्डाणपूल बनवण्याचे काम सुरू करावे. व या अपघातांना थांबवण्याचा प्रयत्न करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!