कोरपना तहसीलदार मा. रणजित यादव (IAS) यांची सामूहिक वन हक्क प्राप्त जांबूळधरा ग्रामसभेला भेट
अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी(वन हक्कांची मान्यता) अधिनियम 2006, नियम 2008 व सुधारित नियम 2012 अंतर्गत चंद्रपूर जिल्हात जवळपास 476 गावांना सामूहिक वन अधिकार प्राप्त झाले असून टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई च्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून यातील 100 गावांमध्ये काम सुरु आहेत. कोरपना तालुक्यात एकूण 13 गावांना सामूहिक वन हक्क मिळाले आहेत. या प्रकल्पात जांबूळधरा बेलगाव, हातलोणी, येरगव्हान, टांगळा, पारडी, पीपर्डा, अकोला, या 8 गावांचा समावेश आहे. या प्रकल्पातूनच या गावांचे आराखडे देखील तयार करण्यात येऊन ते प्रकल्प कार्यालयाला सादर केले गेले आहेत. यातील काही प्राधान्य गावांच्या आराखड्यातील प्रस्तावित कामांना गती देऊन जंगलालगत च्या गावांचा विकास व्हावा या उद्देशाने कोरपना तालुक्याचे मा. तहसीलदार रणजित यादव (IAS) यांनी नुकतीच जांबुळधरा (ग्रामपंचायत मांडवा) ग्रामसभेला भेट दिली. जांबूळधरा ग्रामसभेला 2018 मध्ये सर्वे नं. 14/1 मध्ये 663.94 हे आर क्षेत्र मंजूर झाले असून 2022 पासून सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती सक्रियपणे कार्यरत आहे. या भेटीत ग्रामसभेतील सदस्यांनी वन हक्क क्षेत्राच्या सीमांकनाचा प्रश्न, गावासाठी समाज भवन, पर्यटन विकास कामे, वॉटर फॉल क्षेत्र सुविधा, वैयक्तिक वन हक्क धारकांना लाभाच्या योजना, शेतात विजेच्या खांबाचा प्रश्न, नरेगा यंत्रणा घोषित करणे, राशन कार्ड, जातीचे दाखले, निराधार इ प्रश्नावर चर्चा करण्यात आली. प्रस्तावित कामे प्रशासनाकडून लवकरात लवकर निकाली काढावे अशी विनंती ग्रामसभेकडून करण्यात आली. मा तहसीलदार साहेब यांनी देखील योग्य सहकार्य करण्यात येईल असे ग्रामसभेला सांगितले. या प्रसंगी सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती चे पदाधिकारी तसेच ग्रामसभा सदस्य उपस्थित होते.
अमोल कुकडे
7875874451
संशोधक
टाटा सामाजिक विज्ञान संस्था



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!